Pune News: वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका! शहरातील हे 17 रस्ते होणार 'सुपरफास्ट'

पुणे शहरातील 17 रस्ते सुपरफास्ट होणार असून पुणे महापालिकेकडून आता नव्याने शहरातील 17 रस्त्यांची निवड करून 'मिशन 17' राबवण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. अशातच पुणे शहरातील 17 रस्ते सुपरफास्ट होणार असून पुणे महापालिकेकडून आता नव्याने शहरातील 17 रस्त्यांची निवड करून 'मिशन 17' राबवण्यात येणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील  आणखी 17 रस्ते सुपर फास्ट होणार असून वाहतुक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले 'मिशन 15' पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेकडून  नव्याने शहरातील 17 रस्त्यांची निवड करून 'मिशन 17' राबवण्यात येणार आहे. 

या मिशन अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा, व प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.  रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

( नक्की वाचा : कामाची बातमी : Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कर्ज माफ होतं का? )

पुणे महापालिकेकडून 'मिशन 17'अंतर्गत निवडण्यात आलेले रस्ते!

दरम्यान, पुणे महापालिकेकडून मिशन 17 अंतर्गत निवडलेल्या रस्त्यांमध्ये  सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना एअरपोर्ट रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्त्याचा समावेश आहे. 

Advertisement