सुरज कसबे, प्रतिनिधी:
DCM Ajit Pawar Pune Visit: पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार आहेत, अशी महत्त्वाची आणि मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका तसेच चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले. आजच्या पुणे, पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज भल्या पहाटेच पुणे- पिंपरी- चिंचवडच्या दौऱ्यासाठी शहरात दाखल झाले. आजच्या दौऱ्यात अजित पवार यांनी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा केली. यावेळी नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना अजित पवार यांनी चांगलेच धारेवर धरले तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासनही दिले.
नारळी पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर, मात्र शाळा-कॉलेज सुरुच; पालक विद्यार्थ्यांमध्ये संताप
याचवेळी अजित पवार यांनी महत्त्वाची नव्या महापालिकांबाबत महत्त्वाचे विधान केले. मी तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुया. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असं अजित पवार म्हणाले.
काळानुसार काम करताना काही निर्णय घ्यावे लागतात. मी राजकीय जीवनात काम करत असताना ठाणे महापालिका एकच होती. त्यानंतर आता नवी मुंबई झाली. त्यानंतर उल्हासनगर, पालघर महापालिका झाली. त्याठिकाणी सहा सात महापालिका झाल्या. पुणे, पिंपरी चिंचवड, वाघवस्ती, लोणी- काळभोर, वाघोली, मांजरी भागात ही महापालिका करावी लागेल. आणि नदी ओलांडून इकडे आल्यानंतर एक महानगरपालिका आणि आणखी एक पालिका हिंजवडी आणि वरचा परिसर आहे, त्यासाठी एक करावी लागेल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असं ते म्हणाले.
Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ