Omraje Nimbalkar: रात्रीस खेळ चाले! ओमराजेंसाठी ठाकरेंचा अखेरचा डाव, सावध शिदेंनीही फिल्डिंग लावली

आज ओमराजे निंबाळकर हे आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्याआधीच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनधरणीसाठी मोठा डाव टाकला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरने खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार सध्या शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत मात्र हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी आणखी एक प्रवेश बाकी आहे तो म्हणजे ओमराजे निंबाळकर. ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केला नसल्याने सस्पेन्स वाढला आहे. आज ओमराजे निंबाळकर हे आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्याआधीच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनधरणीसाठी मोठा डाव टाकला आहे. 

High-Speed Rail: मुंबई- पुणे अवघ्या 48 मिनिटात! केंद्र सरकारचा गेमचेंजर प्लॅन; 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉर..

ओमराजेंसाठी ठाकरेंचा अखेरचा डाव

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यामध्ये मुक्कामी होते. आज ते धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्याआधी ठाकरेंनी ओमराजेंना रोखण्यासाठी अखेरचा डाव टाकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. मातोश्रावरील संदेश घेऊन वरुण सरदेसाई हे ओमराजेंना भेटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, "आम्ही केवळ कोर्टातील प्रकरणाच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो," असा दावा केला.

Advertisement

सावध शिंदेंनीही फिल्डिंग लावली 

दुसरीकडे ओमराजेंसाठी एकनाथ शिंदे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.  एकनाथ शिंदे यांचा रात्री उशिरा पुण्यातील शहराध्यक्षांना फोन केला. त्यानंतर  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पुणे शहर शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते दाखल झाले आहेत. पुणे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी हजर झाले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत सर्वजण धाराशिवला जाणार आहेत.

Monsoon Update: मान्सूनची दणक्यात एन्ट्री होणार! 'या' दिवशी महाराष्ट्रात कोसळणार; हवामान विभागाची मोठी अपडेट