Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर

Pune Parts Of City Face Water Supply Disruption On July 17: पुणे शहरात 17 जुलै रोजी काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्रीस्ट्रेस लाइनवर गळती दुरुस्तीचे काम केले जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे:

Water supply Cut off in some areas of Pune City On July 17: पुणेकरांसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.  पुण्यातील  पर्वती, चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे 17 जुलै (गुरुवार) रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दुरुस्ती कामांनंतर 18 जुलै रोजी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे शहरात 17 जुलै रोजी काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्रीस्ट्रेस लाइनवर गळती दुरुस्तीचे काम केले जाईल. यासोबतच जुन्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात फ्लोमीटर बसवणे आणि संबंधित देखभालीचे काम पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट आणि एसएनडीटी पंपिंग स्टेशन येथे केले जाईल.

Advertisement

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांंच्या पाणीसाठी मोठी वाढ

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार? (Water Cuf-off Areas in Pune)

 पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गतातील  गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पार्वती दर्शन, मुकुंदनगर, इ. भागात पाणीपुरवठा बंद राहील. पर्वती एचएलआर टाकी परिसरात सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर फेज 1 आणि 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेनगर, पं.पू.नगर, प.पू.नगर, ए. माळा, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पार्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्व्हे नंबर 42 कोंढवा खुर्द, साईबाबा नगर, या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

Mumbai Lakes Water Level: मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो, एकूण पाणीसाठा 72.61 टक्क्यांवर पोहोचला

पर्वती एलएलआर टाकी परिसर क्षेत्रा अंतर्गातील शहरातील सर्व पेठे, दत्तवाडी क्षेत्र, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन क्षेत्र, शिवाजीनगर क्षेत्र, स्वारगेट क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच  वारजे जलकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील  चांदणी चौक भागात, गांधी भवन टँक भागात, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी भागात पाणी बंद राहील .दरम्यान,  रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी या आवश्यक कामात पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पुणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. 

Advertisement