
रेवती हिंगवे, पुणे
Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यच्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात मिळून ६९ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.
(नक्की वाचा- Airline ticket prices: आता विमान प्रवास करा बिनधास्त ! 'या' मार्गावरील विमान तिकीट दरात मोठी घट)
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा खूप जास्त आहे.
धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी
- खडकवासला : ५६.८२ टक्के
- पानशेत: ६८.६३ टक्के
- वरसगाव: ७३.५२ टक्के
- टेमघर: ६२.०२ टक्के
- एकूण पाणीसाठा: ६९.१४ टक्के
- गेल्या वर्षी आजच्या तारखेला असलेला पाणीसाठा: २५.९४ टक्के
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world