Who is the accused, Chetan Chaudhary? : पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाचा १८ जून रोजी मृत्यू झाला होता. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतनला लोहगडावरुन धक्का मारला. केतनच्या हत्येच्या आरोपाखाली सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला अटक करण्यात आली आहे.
केतन आणि सियाची या वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात त्यांची लग्नाची तारीख होती. लग्न मोठेखानी स्वरुपात केलं जाणार होतं. केतनचे वडील विशाल अग्रवाल मोठे व्यावसायिक आहेत. त्यांनी केतनच्या लग्नासाठी जयपूरमध्ये १७ कोटींचा पॅलेस बुक करण्यात आला होता. याशिवाय २ विमानंही बुक केली होती. अशात सियाने ज्यासाठी केतनची हत्या केली तो चेतन कोण आहे?
चेतन चौधरी कोण आहे?
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, २० वर्षीय सिया गोयल हिचं २३ वर्षीय चेतन चौधरीसोबत कथितपणे संबंध होते. दोघांची भेट एका बिझनेस मीटिंगदरम्यान झाली होती. सिया एका बेकरीची संचालक होती. तर चेतन ड्राय फ्रूट व्यवसायाशी जोडलेला होता. त्याचे वडील बाबूलाल चौधरी हे मार्केटयार्ड परिसरात ड्रायफ्रूट आणि किराण्याचा व्यवसाय करतात. चेतनने बीबीएचे शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो वडिलांना व्यवसायात मदत करीत होता. चेतनला क्रिकेटची आवड आहे. तो स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत होता. भविष्यात रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असल्याचीही माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ नोव्हेंबरदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली.तपास एजन्सीने दावा केला आहे की, सिया आणि केतनमधील नात्यामुळे चेतन खूश नव्हता. केतन हा आपल्या मार्गातील अडथळा असल्याचं त्याला वाटत होतं. यामुळे दोघांनी कथितपणे केतनला मार्गातून हटविण्याचा प्लान आखला.