2 days ago

Pune Palkhi 2025 Live Check : राम कृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून गेली आहे. देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यासाठी रवाना झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj Palkhi) यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे. दापोडी येथे दुपारचा मुक्काम करून सोहळा चार वाजताच्या सुमारास संगमवाडी (Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) परिसरातून पुण्यात दाखल होईल आणि पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा दोन मुक्काम असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फुलेनगर येथे पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी 4 च्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल. 

दरम्यान https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track या लिंकवर क्लिक करून तुम्ही पालखी सोहळ्याचे लेटेस्ट अपडेट मिळवू शकता.  

Jun 20, 2025 22:13 (IST)

Pune Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा आज पुण्यातील भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे. याठिकाणी आता पालखी पोहचली आहे .याअगोदरच पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणी भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेणार आहेत.

Jun 20, 2025 21:38 (IST)

Pune Palkhi: संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामा ठिकाणी पोहोचली

संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या ठिकाणी आज मुक्काम करणार आहे त्या निवडुंगा विठोबा मंदिरात पोहोचली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीने शगुन चौक ओलांडला आहे. 

Jun 20, 2025 21:00 (IST)

Pune Palkhi Live Update: संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली तांबोळी मशिदीजवळ

संत तुकाराम महाराजांची पालखी तांबोळी मशिदीजवळ पोहोचली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गरवारे पुलाजवळ आली आहे.  

Jun 20, 2025 20:07 (IST)

Pune Palkhi: पुण्याच्या एबीसी चौकातील संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल

पुण्याच्या एबीसी चौकातील संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली आहे. तर  संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोलीस मुख्यालयाच्या पुढे आली आहे. 

Advertisement
Jun 20, 2025 19:50 (IST)

Live Update : गरुड गणपती चौकात पोहोचली संत तुकाराम महाराजांची पालखी

गरुड गणपती चौकात पोहोचली संत तुकाराम महाराजांची पालखी. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सिमला चौक ओलांडला आहे. या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत. 

Jun 20, 2025 19:25 (IST)

मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीडमध्ये पाडळसिंगीत मुक्काम

श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर या आषाढी वारीच्या मार्गावरून मुक्ताबाईंची पालखी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे पोहोचली आहे. दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात वावरणाऱ्या या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम येथे होत आहे. या वारीत जवळपास दोन हजार वारकरी सहभागी झाले असून, पुढील सहा दिवस पालखी बीड जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. तीन जुलै रोजी पंढरपूरात या दिंडीचे आगमन होणार आहे. वारीदरम्यान आरोग्य आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा आणि बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. श्रद्धा, भक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम असलेल्या या वारीने जिल्ह्यात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Jun 20, 2025 18:55 (IST)

Pune Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडी पुल येथून मार्गस्थ

संत तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युशन कॉलेज गेट ओलांडून पुढे गेली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडी पुल येथून मार्गस्थ झाली. दोन्ही पालख्यां बरोबर मोठ्या संख्येने भाविक आहेत. 

Jun 20, 2025 18:37 (IST)

Pune Palkhi: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांवर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

गरवारे पुलावर पालख्या पोहचणार. तुकाराम पादुका चौकात संत तुकाराम महाराजांची पालखी पोहचली आहे. तर  संगमवाडी पुलावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत केले जाईल. त्यासोबतच हेलिकॉप्टर मधून देखील पालखी रथावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

Advertisement
Jun 20, 2025 18:14 (IST)

Pune Palkhi: संत तुकाराम महाराजांची पालखी एफसी रोडवर पोहोचली

संत तुकाराम महाराजांची पालखी एफसी रोडवरील ज्ञानेश्वर पादुका चौकात पोहोचली आहे. तर  संगमवाडी पूल येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसाव्यासाठी थांबली आहे.

Jun 20, 2025 17:41 (IST)

Pune Palkhi: संत तुकाराम महाराजांची पालखी सिमला चौकात

संत तुकाराम महाराजांची पालखी सिमला चौकात पोहोचली. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडी पुलावर पोहोतली आहे. पालखी बरोबर मोठ्या प्रमाणात भाविक आहेत. शिवाय दर्शनासाठी ही गर्दी झाली आहे. 

Jun 20, 2025 17:36 (IST)

Pune Palkhi: संभाजी भिडे यांच्याकडून धारकऱ्यांसह पालखीला वंदन

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल 

संभाजी भिडे यांच्याकडून धारकऱ्यांसह पालखीला वंदन 

दरवर्षी प्रमाणे यंदाही संभाजी भिडे यांच्या कडून तुकाराम महाराज यांच्या पादुकांना वंदन

संभाजी भिडे यांच्याकडून धारकऱ्यांसह पालखीला वंदन 

दरवर्षी प्रमाणे यंदाही संभाजी भिडे यांच्या कडून तुकाराम महाराज यांच्या पादुकांना वंदन

Jun 20, 2025 17:35 (IST)

Pune Palkhi: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा दिंडीत सहभाग, सर्वांचे वेधले लक्ष

वारी म्हटलं की त्यामध्ये प्रामुख्याने सहभागी होणारा हा शेतकरी वर्ग असतो आणि आपण पाहतो की मागील काही वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय अतिशय गहन बनलेला आहे हाच विषय घेऊन काही सजग नागरिकांनी आत्महत्याग्रस्त मुलांची दिंडी ही या वारीत सहभागी केली आहे.दरवर्षी अशा पद्धतीने अनाथाश्रमात राहणाऱ्या या मुलांची निघणारी ही दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेते. ही छोटी मुले हातात फलक घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका असे आवाहन करतात.

Jun 20, 2025 17:08 (IST)

pune Palkhi: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पुण्यात दाखल

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पुण्यात दाखल झालेला आहे पुण्याच्या संगमवाडी परिसरातील संगम पुलाखाली आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने जल्लोषात या पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून टाकला पुण्यातील अनेक भाविक भक्त यावेळी पालखी मधील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते 

Jun 20, 2025 17:07 (IST)

Pune Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांची पालखी पाटील इस्टेट इथं पोहोचली

संत तुकाराम महाराजांची पालखी पाटील इस्टेट  इथं पोहोचली आहे. तर बॉम्बे सॅपर्स जवळ संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोहोचली आहे. 

Jun 20, 2025 16:47 (IST)

Pune Palkhi: विसाव्यानंतर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या झाल्या मार्गस्थ

संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती उड्डाणपुलाजवळ पोहचत आहे. तर विश्रांतवाडी विसावा येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली आहे.

Jun 20, 2025 16:10 (IST)

Pune Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विश्रांतवाडी येथील विसाव्यासाठी थांबली

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विश्रांतवाडी येथील विसाव्यासाठी थांबली 

Jun 20, 2025 15:54 (IST)

Pune Palkhi News: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रोडजवळील आरटीओ कार्यालयाजवळ पोहोचली

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रोडजवळील आरटीओ कार्यालयाजवळ पोहोचली 

Jun 20, 2025 15:50 (IST)

Pune Palkhi 2025: पीएमसी कॉलनी येथे संत तुकाराम महाराज पालखी थांबली

त्या आधी वाकडेवाडी एसटी स्टँड परिसरातून संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे सरकली. एमआयडीसी कार्यालय वाकडेवाडी मार्गे पुढे गेली. वीर चाफेकर चौक,वाकडेवाडी पार करत संत तुकाराम महाराज पालखी मार्गस्थ झाली. 

Jun 20, 2025 15:34 (IST)

Pune Palkhi News: पालखी बघायला गेलेला 16 वर्षीय मुलगा तोल जाऊन मुळा नदीत पडला

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज दुपारच्या सुमारास पुणे शहराकडे प्रस्थान होत असताना पिंपरी चिंचवड शहराच्या वेशीवरती असलेल्या दापोडीतील मुळा नदीच्या पुलावरून तोल जाऊन पाण्यात पडलाय. वेदांत बोत्रे अस या मुलाचे नाव आहे, वेदांत हा फोटो स्टंट करताना मुळा नदीच्या पुलावरून पाण्यात पडला होता, पाण्यात पडल्यावर ती तो नदीचा प्रवाह जास्त असल्याने तसेच नदीमध्ये असलेल्या बांधकामांच्या  पिलरच्या लोखंडी कॉलमला तो अटकून राहिला, याबाबत तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच  त्याला बोट आणि ओबीएम च्या सहाय्याने सुखरूप पाण्यातून बाहेर काढून त्याच्या आई वडिलांच्या  स्वाधीन केले आहे.

Jun 20, 2025 15:21 (IST)

Pune Palkhi: पुण्यामध्ये दोन्ही पालख्या असणार मुक्कामी

आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या ह्या मुक्कामी असणार आहेत देहू मधून प्रस्थान केलेल्या पालखीचा म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी मधून  प्रस्थान झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी असे दोन्ही पालख्या आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत पुण्यातील संगमवाडी येथे दुपारचा विसावा असेल याच ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या दोन्ही पालख्यांचे स्वागत देखील करण्यात येणार आहे रात्री दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पालख्यांचे दर्शन घेतील या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे एकूणच आता पुण्यनगरी ही वारकरीमय झालेली आहे 

Jun 20, 2025 15:16 (IST)

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने कमलनयन बजाज उद्यान पार करत पुढे केली वाटचाल

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने कमलनयन बजाज उद्यान पार करत पुढे केली वाटचाल 

Jun 20, 2025 15:13 (IST)

Live Update: संत तुकाराम महाराजांची पालखी एसीपी येरवडा कार्यालयाबाहेर

संत तुकाराम महाराजांची पालखी एसीपी येरवडा कार्यालयाबाहेर काही वेळासाठी थांबली आहे. इथं भाविक दर्शन घेत आहेत. 

Jun 20, 2025 14:57 (IST)

Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी डॉ. नानासाहेब परूळेकर विद्यालयावरुन रवाना..

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी डॉ. नानासाहेब परूळेकर विद्यालयावरुन रवाना..

Jun 20, 2025 14:47 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराज पालखी ऑल सेंट चर्चवरुन रवाना...

संत तुकाराम महाराज पालखी ऑल सेंट चर्चवरुन दुपारी  २.३८ वाजता रवाना झाली.

Jun 20, 2025 14:27 (IST)

Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी छत्रपती संभाजी महाराज चौकावरुन रवाना

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी छत्रपती संभाजी महाराज चौकावरुन रवाना झाली आहे. दुपारी साधारण २.१२ वाजता पालखी येथून रवाना झाली. 

Jun 20, 2025 14:25 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराजांची पालथी ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालयाजवळ पोहोचली

संत तुकाराम महाराजांची पालथी ऑर्डनन्स फॅक्टरी रुग्णालयाजवळ पोहोचली

Jun 20, 2025 13:44 (IST)

Live Update : बोपखेल फाट्यावरुन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुणे शहरात प्रवेश

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी देखील बोपखेल फाट्यावरुन पुणे शहरात दाखल झाली आहे.  

Jun 20, 2025 13:42 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराज पालखीने बोपोडी मेट्रो स्टेशन ओलांडलं

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. पैकी संत तुकाराम महाराज पालखीने बोपोडी मेट्रो स्टेशन ओलांडलं आहे. 

Jun 20, 2025 12:55 (IST)

Live Update : भोपखेल फाट्याजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतीक्षा

भोपखेल फाट्याजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतीक्षा केली जात आहे. पुणे पोलिसांची टीम माऊलींच्या पालखीची प्रतीक्षा करीत आहेत. 

Jun 20, 2025 12:19 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराज पालखी हॅरिस पूल विसारा पॉइंट येथे थांबली

संत तुकाराम महाराज पालखी हॅरिस पूल विसारा पॉइंट येथे थांबली. काही वेळानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ होईल

Jun 20, 2025 12:04 (IST)

Live Update : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची तपासणी

पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पालखी पुण्यात दाखल होत असताना सर्व व्यवस्थेची तपासणी केली.

Jun 20, 2025 11:51 (IST)

Live Update : तुकाराम महाराजांची पालखी हॅरिस पुलावरून पुढे जाणार

संत तुकाराम महाराज पालखी लवकरच पुणे शहरात दाखल होणार. तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील हॅरिस पुलावरून पुढे जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. पालखीतील पहिली दिंडी पुणे शहरात दाखल झाली आहे. तर शेवटची दिंडी पुणे शहरच्या प्रवेशद्वारावर आहे. 

Jun 20, 2025 11:09 (IST)

Live Update : इथं मिळेल दोन्ही महत्त्वाच्या पालख्यांचे लेटेस्ट अपडेट

पुण्यातील दोन्ही महत्त्वाच्या पालख्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

दरम्यान https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track या लिंकवर क्लिक करून तुम्ही पालखी सोहळ्याचे लेटेस्ट अपडेट मिळवू शकता.  

Jun 20, 2025 11:06 (IST)

Live Update : आज तुकाराम पालखीचा मुक्काम कुठे कुठे असेल?

जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj Palkhi) यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे. पालखी दापोडी येथे दुपारचा मुक्काम करून चार वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल आणि पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा दोन  मुक्काम असेल. 

Jun 20, 2025 10:43 (IST)

Live Update : पुणे वाहतूक विभागाची पालखी ट्रॅकिंग सुविधा

Jun 20, 2025 10:42 (IST)

Live Update : दोन्ही पालख्या दुपारपर्यंत पुणे शहरात दाखल होणार

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दुपारपर्यंत पुणे शहरात दाखल होणार आहे.