Pune Palkhi 2025: माऊलींच्या पालखी सोहळ्यात विश्वस्तांचा थयथयाट! वारकरी, माध्यमांशी उद्धट वागणूक; VIDEO

Pune Dynaneshwar Mauli Palkhi Sohala Video: आळंदी देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजननाथ योगी यांनी वारकऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचे समोर आले असून त्याचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala 2025: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा पुण्यात आहे. रविवारी ही पालखी पुण्यातील भवानी पेठेतून पुढे मार्गस्थ होईल. शुक्रवारी रात्री उशिरा जेव्हा या ही पालखी मुक्कामी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात दाखल झाली तेव्हा अनेक पुणेकर भाविक हे दर्शनासाठी याठिकाणी आले होते. यावेळी आळंदी देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजननाथ योगी यांनी वारकऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचे समोर आले असून त्याचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावरील सुरक्षेसाठी यंदा एआयची नजर, सुरक्षेसाठी मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्गही बदलला

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ह्या मुक्कामी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने माध्यमांचे कॅमेरे हे या मंदिरात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा विशेष चित्रीकरणाचा ताफा देखील दाखल झाला अशावेळी मंदिरात गर्दी होणे साहजिक होते. मात्र मंदिरात संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुका आत आणताना आळंदी देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजननाथ योगी यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर विनाकारण आगपाखड करण्यास सुरुवात केली. खर तर पोलिस प्रशासनाने निर्धारित केलेल्या जागेवर सगळे थांबलेले असताना या महाशयांनी पोलिसांसोबत माध्यमांच्या कॅमेऱ्याना अरेरावी करत बाहेर हुसकण्याचा प्रयत्न केला...त्यांच्या या कृतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यानंतर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

या धक्कादायक प्रकारानंतर  आता आळंदी देवस्थानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी आज याबाबत बैठक घेऊन माध्यमांची माफी मागू असे सूचित केले आहे तसेच या निरंजन नाथ योगी यांना बडतर्फ करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असे म्हटल्याने योगी यांना कोणते विशेष अधिकार आहेत ज्याचा ते एवढा अभिमान बाळगतात हे पाहण गरजेचे आहे.

जो काही प्रकार घडला आम्ही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे, यात आधारवंत असतो आम्ही शिकलेलो असतो, पण जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत. काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आम्ही बैठक घेतली, त्यानंतर दिलगिरी वक्त करणारी आम्ही आता ही एक बैठक घेणार आहोत, असं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर सर्व सोयीसुविधा; पुणे जिल्हा परिषदेकडून स्पेशल APP लॉन्च

दरम्यान, त्या बैठकीत मीडियातील हे बांधव वारीचं हे वैभव दाखवण्यात आम्हाला  मदत करत असतात. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी वक्त करतो. नेमकं काय घडलं या प्रकार घडला याच आम्ही चिंतन केलं आणि आजही करणार आहोत.योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आम्हाला नाही याची वेगळी व्यवस्था असते, असंही ते पुढे म्हणाले.