Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण! पुणे पोलिसांना सर्वात मोठा धक्का; बिल्डरच्या अल्पवयीन लेकाला दिलासा

Pune Porsche Car Accident Case latest Update: अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, बाल न्याय मंडळाने आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Porsche Car Accident Updates:  पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांन बाल न्याय मंडळाकडून मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी झालेल्या या खटल्याच्या सुनावणी, बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यामध्ये अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, बाल न्याय मंडळाने आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.

कोर्टाने काय म्हटलं?

पुण्यातील गाजलेल्या पोर्शे गाडीच्या अपघात प्रकरणात सरकारी वकिलांकडून आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती.  आरोपी 17 वर्षीय मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्शे चालवत असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, अशी मागणी सरकारी बाजूने करण्यात आली होती.  या प्रकरणावर किशोर न्याय मंडळ (JJB) आपला निर्णय दिला असून ही मागणी फेटाळून लावली आहे. 

Pune Crime : पुण्याला हादरवणारं पोर्शे प्रकरण, हकनाक बळी गेलेल्या दोघांना न्याय मिळाला? वर्षभरानंतर काय आहे परिस्थिती?

कसा घडला होता अपघात?

19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्श कारने दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना धडक दिली. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) जागीच मृत्युमुखी पडले. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा व्यक्ती फक्त 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.

अपघातानंतर काय घडले?

सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रकरण गंभीर झाले. सुरुवातीला, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) अवघ्या 14 तासांत आरोपीला 100 शब्दांचा निबंध, 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती.

Advertisement

आई, वडील, भाऊ... रक्तासाठी रात्रभर पळापळ; पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा 'कार'नामा उघड