
अविनाश पवार, प्रतिनिधी
पुण्यातील कल्याणी नगर पोर्शे अपघाताला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या अपघातात 2 आयटी तरुणांचा बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा कडक पाठपुरावा आणि जनक्षोभ आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज 19 मे 2025...पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या भीषण पोर्शे अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. या अपघातात पुण्यात नोकरीसाठी आलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवलं आणि कायद्याच्या अंमलबजावणीपासून ते सार्वजनिक व्यवस्थेपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक वर्षानंतर काय आहे परिस्थिती?
मे 2025 – एक वर्षानंतर
• प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे:
• अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही, यावर बाल न्याय मंडळाचा निर्णय प्रलंबित.
• काही आरोपींच्या जामिनाच्या अर्जावर अजूनही सुनावणी सुरू.
• विशेष न्यायालयात आरोपी वडील, डॉक्टर, व इतर मुख्य संशयितांविरुद्ध आरोपपत्रांची सुनावणी सुरू.
सार्वजनिक भावना:
• कल्याणी नगर, कोरेगाव पार्क परिसरातील नागरिक नाराज – रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या, गोंगाट, कायद्याचे उल्लंघन कायम.
• कडक अंमलबजावणी व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी – जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.
नक्की वाचा - Solapur News : बहिणीच्या लग्नाचा आनंद, मात्र...लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला
घटना – 19 मे 2024
• वेळ: पहाटे 2:15 वाजता
• ठिकाण: कल्याणी नगर, पुणे
• घटना: 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत पोर्शे गाडी चालवत असताना त्याने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिली.
• मृत्यू: मूळचे मध्य प्रदेशातील आयटी व्यावसायिक अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू.
• कार चालविण्यापूर्वी आरोपीने दोन पबमध्ये पार्टी केली होती, हे तपासात उघड.
19 मे 2024 – तात्काळ प्रतिसाद
• अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
• बाल न्याय मंडळाने काही तासांत जामिनावर सोडले, अट: रस्ता सुरक्षा यावर निबंध लिहिणे, ट्राफिक पोलिसांसोबत काम करणे इत्यादी.
• सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली.
20–21 मे 2024 – जनक्षोभ
• माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून तीव्र विरोध.
• राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांच्याकडून कडक कारवाईचे आश्वासन.
22–23 मे 2024 – न्यायालयीन फेरविचार
• बाल न्याय मंडळाने आधीचा जामिनाचा आदेश मागे घेतला.
• अल्पवयीन मुलाला निगराणी गृहात ठेवण्यात आले.
मे 2024 अखेर – तपासात नवे खुलासे
• तपासात पुढील गोष्टी समोर आल्या:
• अल्पवयीन मुलाने दारू घेतल्याचे पुरावे
• ब्लड सॅम्पल खोटे देण्याचा प्रयत्न
• पब-बारमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यपुरवठा
• पुणे पोलिसांनी पबांवर छापे टाकून कारवाई सुरू केली.
जून 2024 – अटकेची मालिका
• आरोपी मुलाच्या वडिलांना अटक – बेकायदेशीररित्या गाडी चालवू दिल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप.
• रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी अटकेत, कारण त्यांनी ब्लड सॅम्पल बदलण्यास मदत केली.
• पब मालक, वडिलांचे सहकारी यांच्यावर IPC आणि बाल न्याय कायद्यान्वये गुन्हे दाखल.
जून–ऑगस्ट 2024 – तपासाचा विस्तार
• राज्य उत्पादन शुल्क विभागाने 49 पब-बारची अनुज्ञप्ती निलंबित केली.
• 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल – पुरावे नष्ट करणे, न्यायप्रक्रियेला अडथळा निर्माण करणे.
2024 अखेर – गुन्हेगारी विरोधी कडक कारवाई
• पुणे पोलिसांकडून MPDA कायद्यान्वये काही गुन्हेगारांवर कारवाई.
• नाईटलाइफ हॉटस्पॉटमधील गुन्हेगारांवर नजर – काहीजण तडीपार, तर काहींना प्रतिबंधात्मक अटक.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world