जाहिरात

Purandar Airport: पुरंदरचे शेतकरी होणार मालामाल! विमानतळ मोबदल्याचे पॅकेज ठरले; प्रति एकर 'इतके' कोटी मिळणार

सोमवारपासून शेतकऱ्यांंना प्रत्यक्ष मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे. मोबदल्यानंतर भूसंपादनाचीही प्रक्रिया सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना नेमका किती मोबदला देण्यात येणार आहे? जाणून घ्या सविस्तर... 

Purandar Airport: पुरंदरचे शेतकरी होणार मालामाल! विमानतळ मोबदल्याचे पॅकेज ठरले; प्रति एकर 'इतके' कोटी मिळणार

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Purandar Airport Land Acquisition Compensation: पुण्याच्या पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुरंदर विमानतळाच्या कामाला आता गती येणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर मोबदल्याचे पॅकेजही ठरवण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांंना प्रत्यक्ष मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे. मोबदल्यानंतर भूसंपादनाचीही प्रक्रिया सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना नेमका किती मोबदला देण्यात येणार आहे? जाणून घ्या सविस्तर... 

पुरंदरचे शेतकरी होणार मालामाल! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत सुरू असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक एकरासाठी १.५ कोटी रुपयांचा दर निश्चित केला असून, या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुढील महिन्यापासून जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि कामाला वेग देण्यासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' हे तत्त्व वापरले जाणार आहे. प्रशासनाचे मुख्य लक्ष हे आगामी ६ महिन्यांत जमिनीचा ताबा मिळवण्यावर आहे. या विमानतळामुळे पुरंदर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 

VIDEO अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे कमबॅक, महेश मांजरेकरांच्या लेकीचीही मालिका विश्वात एण्ट्री, प्रोमो पाहिला?

जमीन संपादनासाठी आवश्यक निधी आणि प्रक्रियेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, मे महिन्यापासून गावागावांत संमतीपत्रांची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. या कामासाठी सात गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात येणार आहेत. भूसंपादनामध्ये घर, फळबागा, विहिरी यांचाही स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे. 

दरम्यान, याआधी पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याच ६ हजार कोटींमधून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. 

Ahilyanagar News: रात्रीच्या अंधारात पापाचा खेळ! गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क उद्ध्वस्त


 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com