Purandar Airport: पुरंदर विमानतळ अपडेट! शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गूडन्यूज; महत्त्वाची मागणी मान्य

सध्याच्या घडीला प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्याचे काम प्राधान्याने सुरू असून, शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे:

 Purandar Airport Update:  पुणे जिल्ह्याच्या महत्त्वाकांक्षी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. जमीन संपादनासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण करणे आणि मोबदल्याची रक्कम स्वीकारण्यासाठी आता पात्र शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंतची नवीन मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जमीन देण्यास इच्छुक असलेल्या मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रियेपासून लांब असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

VIDEO: 'पैशाची वाट पाहू नका', 70 वर्षांच्या आजोबांचा लाखमोलाचा सल्ला, तब्बल 10 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडिओ

पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट, शेतकऱ्यांसाठी Good News

​प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी मुदत संपत आल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत जिल्हा प्रशासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केवळ पुणेच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे जमिनीचे हस्तांतरण वेगाने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनीचे हस्तांतरण वेळेत पूर्ण होणे ही एक आवश्यक अट आहे.

Advertisement

​जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करून आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करावी. जेणेकरून प्रकल्पाच्या पुढील कामांना कोणतीही बाधा येणार नाही. भूसंपादनाच्या या प्रक्रियेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. सध्याच्या घडीला प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्याचे काम प्राधान्याने सुरू असून, शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)