जाहिरात

Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन

Mumbai-Pune Bullet Train : भारतीय रेल्वेने देशातील प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे 7 हाय-स्पीड रेल कॉरिडोर बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.

Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन

भारतीय रेल्वेने देशातील दळणवळण क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने देशात 7 प्रमुख हाय-स्पीड रेल कॉरिडोर विकसित करण्याची योजना तयार केली असून, यासाठी तब्बल 16 लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित आहे. 

या भव्य प्रकल्पामुळे दोन मोठ्या शहरांमधील तासांचे अंतर मिनिटांवर येणार असून, मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत शक्य होणार आहे. सध्या मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी 'डेक्कन क्वीन' ही सर्वात वेगवान ट्रेन असून या प्रवासासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. मात्र, नवीन हाय-स्पीड रेल्वे मार्ग आल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच कोलकाता येथे या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. या नवीन मार्गांमुळे केवळ पश्चिम भारतच नव्हे, तर दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतालाही वेगवान रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

रेल्वे मंत्रालयाच्या योजनेतील 4 प्रमुख मार्ग 

  • दिल्ली ते वाराणसी- 945 किमी  (3.5 तास)
  • वाराणसी ते सिलिगुरी -  670 किमी(2.4 तास)
  • मुंबई ते पुणे- 170 किमी (48 मिनिटे)
  • पुणे ते हैदराबाद - 501 किमी (1.6 तास)

या नवीन प्रकल्पामुळे दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा एकूण प्रवासाचा वेळ अवघा 6 तासांवर येणार आहे. हे हाय-स्पीड नेटवर्क अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या देशातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल.

(नक्की वाचा- Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!)

पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये धावणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकामाचा वेग आता प्रति महिना 15 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. बुलेट ट्रेन सेवा अधिकृतपणे ऑगस्ट 2027 मध्ये सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरत ते बिलिमोरा या दरम्यान बुलेट ट्रेनचे उद्घाटन करून ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com