Pune Dam Water Level: खडकवासला धरणक्षेत्र 85. 20 टक्के भरलं! 'या' दोन धरणांमधून विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

Maharashtra Rain Pune Dam Water Storage: तुफान पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 85.20 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Rain Dam Water Storage: मुंबई- पुण्यासह राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पालघर, चंद्रपूरसह  पुणे जिल्ह्यालाही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 85.20 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 24.84 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 85.20  टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.गेल्या यावर्षी याचवेळी धरणात 22.25 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 76.32 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा अडीच टीएमसी पाणीसाठा जास्त होता. 

Pune News: पवना आणि भाटघर धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नागरिकांना महत्त्वाचा इशारा

खडकवासला धरणात ८५. २० टक्के पाणीसाठा

खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात. वरसगाव धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढल्याचे दिसत आहे. सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण १.१३ टीएमसी, पानशेत ९.२३ टीएमसी, वरसगाव ११.५२ टीएमसी, टेमघर २.९५ टीएमसी इतके धरण भरले आहे. 

मुळशी धरणातून विसर्ग सुरु

मुळशी धरण ८३.२०% भरले आहे व पाऊस अधिक प्रमाणात होत आहे.  मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 8900 Cusecs सुरु असणारा विसर्ग सकाळी ९:०० वाजता  12200 Cusecs करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

आठवडाभर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 'सैराट' पाऊस; सुट्टीचा प्लान करीत असाल तर अलर्ट व्हा!

कासारसाई धरणातूनही विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तसेच  कासारसाई धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरु असलेला ४१४ क्यूसेक्स विसर्ग वाढवून १४०० क्युसेक्स करण्यात येत आहे. पाऊस चालू/वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल. त्यामुळे  नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असंही प्रशासनाने म्हटलं आहे.