Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

वनविभागाकडून सिंहगड किल्ल्यासाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून गडाची माहिती, गडावर किती गर्दी आहे, घाटात वाहतूक कोंडी किती आहे, याची माहिती दिली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर मोठी गर्दी होते. पर्यटकांसाठी पावसाळ्यातील आवडत्या ठिकाणांमध्ये सिंहगड किल्ल्याचा समावेश आहे. याशिवाय पावसाळ्यात ट्रेकर्सही सिंहगड किल्ल्यावर आवर्जुन हजेरी लावतात. दरम्यान यापुढे सिंहगडावर जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांनी गडावर प्लास्टिक बाटल्या किंवा प्लास्टिकच्या तत्सम वस्तू फेकल्यास त्यांना दंडाची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट

1 जूनपासून सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवसात आणि पावसाळ्य़ात सिंहगडावर मोठी गर्दी होते. शिवकालीन महत्त्वाचा ठेवा असलेल्या या सिंहगडावर देशभरातील पर्यटक आवर्जुन येतात. पावसाळ्यात येथील आल्हाददायक वातावरण पर्यटक एन्जॉय करतात. 

Advertisement

वनविभागाकडून सिंहगड किल्ल्यासाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून गडाची माहिती, गडावर किती गर्दी आहे, घाटात वाहतूक कोंडी किती आहे, याची माहिती दिली जाणार आहे.