Swarget Depo News: शेकडो कंडोम्स, साड्या अन् बेटशीट.. पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील भयानक दृश्य

Pune Swarget Bus Depo Incident Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकात धाव घेत एसटी बसेसची तसेच आगारातील कार्यालयाची तोडफोड केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास सांगोल्याकडे निघालेल्या तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेत नराधमाने हे विकृत कृत्य केले. या भयंकर घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून स्वारगेट स्थानक प्रशासन तसेच पुणे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या भयंकर घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप होत आहे. अशातच या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकात धाव घेत एसटी बसेसची तसेच आगारातील कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी  आगारात उभ्या असलेल्या बसेसमध्ये अशा प्रकारची काळी कृत्ये होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. 

वसंत मोरेंसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागरेट स्थानकात येत आंदोलनही केले. यावेळी वसंत मोरे यांनी बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिनची तोडफोड केली. स्वारगेट बसस्थानकातील उभ्या बसेसमध्ये शेकडो कंडोम्स, जुन्या साड्या आढळत आहेत. म्हणजे इथे दररोज गैरप्रकार होतात. मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला. 

( नक्की वाचा : CBSE Exam : दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, वाचा काय आहे प्रस्ताव? )

यावेळी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या जुन्या बसेसचा आढावा घेतला असता धक्कादायक प्रकार समोर आला. या जुन्या गाड्यांमध्ये साडया, शर्ट, बेडशीट तसेच कंडोम्सची पाकिटे आढळून आलीत. त्यामुळे या जुुन्या बसेसचा नेमका कशासाठी वापर होतो? या बसेसमध्ये अशाच प्रकारचे गैरप्रकार होतात का? यामध्ये स्थानकातील सुरक्षा कर्मचारीही सहभागी आहेत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

Advertisement

दरम्यान, तरुणीसोबत हे कृत्य करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर विविध भागात चोरी, मारहाण चैन स्नेचिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या शोधासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.