मुंबई गोवा हायवेचे इंदापूर ते माणगाव दरम्यानचे काम अजूनही सुरू आहे. शिवाय हा महामार्ग माणगावच्या बाहेरून जाणार आहे. माणगावची बाजारपेठ असल्याने बायपास काढला जात आहे. ही बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. शिवाय सर्व गाड्या या मार्गाने जात असल्याने ट्राफीकची समस्या ही नेहमीचीच झाली आहे. असं असलं तरी काही चालक हे या बाजारपेठेतूनह सुसाट गाडी चालवतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अशीच एक दुर्घटना मंगळवारी घडली आहे. या अपघातात तीन जणांना आपला जीव जागीच जमवाला लागला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणगाव बाजारपेठेतून भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हल्स चालला होता. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने आधी सायकलला धडक दिली. त्यानंतर दोन पादचाऱ्यांना ही चिरडले. या भीषण धडकेत तीन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये रस्त्यावरून चालत असणाऱ्या पती पत्नीचा समावेश आहे. हा अपघात माणगाव उपजिल्हा रुग्णालया समोरच झाला. अपघात झाल्यानंतर एकच धावपळ उडाली. रस्त्यावर सामान विक्रीसाठी बसणाऱ्या दुकानदारांचेही यात नुकसान झाले. या अपघातानंतर घाबरलेल्या फेरीवाल्यांनी दुकाने तिथेच सोडून पळ काढला.
भरधाव वेगातील प्रवासी वाहतूक करणारा हा टेम्पो ट्रॅव्हल्स होता. माणगाव बाजारपेठेत नेहमी गर्दी असते. अशा वेळी गाडी हळू चालवणे गरजेचे होते. पण त्याने तसे केले नाही. शिवाय गर्दीचा अंदाज त्या चालकाला आला नाही. शेवटी त्याचे नियंत्रण सुटले. गाडी सावरण्याच्या नादात त्याने सायकलचालकाला धडक दिली. त्यानंतर दोन पादचाऱ्यांना चिरडलं. त्यानंतर एक दुचाकी आणि पोलीस जीपला ही धडक दिली. हा अपघात सी सी टिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.