
पाकिस्तानची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. याबातमीमुळे पाकड्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्याला कारणही तसेच आहे. भारताच्या सर्वात घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे अपग्रेडेड वर्जन युद्ध ड्यूटीवर तैनात करण्यात आले आहे. ब्रह्मोसच्या तैनातीमुळे पाकिस्तान तणावात आहे. त्यांचे टेन्शन निश्चतच वाढले आहे. यासोबतच राफेल फायटर प्लेनवर ब्रह्मोस-एनजी क्रूझ क्षेपणास्त्र लावण्यासही हिरवा झेंडा मिळाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तान ब्रह्मोसच्या दहशतीत का आहे?
- भारताचे सर्वात घातक क्षेपणास्त्र
- सर्जिकल स्ट्राईकसाठी धोकादायक शस्त्र
- जगातील सर्वात प्रभावी क्रूझ क्षेपणास्त्र
- पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा 3 पट वेगवान
- आधुनिक डिफेन्स सिस्टीमला भेदण्याची क्षमता
- शत्रूंना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ नाही
- कमी उंचीमुळे ट्रॅक करणे खूप कठीण
- रडारला चकवा देऊन अचूक निशाणा
- कोठूनही सोडता येणारे क्षेपणास्त्र
- समुद्र, जमीन, आकाश तिन्ही व्हर्जन उपलब्ध
- हवेतच आपला मार्ग बदलण्यास सक्षम
- चालत्या-फिरत्या लक्ष्यालाही भेदण्याची क्षमता
भारत आणि रशियाद्वारे संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे नाव ब्रह्मपुत्रा आणि मोस्कवा नद्यांवरून ठेवले आहे. जे सांस्कृतिक वारसा आणि धोरणात्मक सहकार्याचे प्रतीक आहे. त्याचे भारतीय नाव ब्रह्मपुत्रा हे हिंदूंच्या निर्मितीचे देव ब्रह्मा यांच्याशी जोडलेले आहे. धोरणात्मकदृष्ट्या ब्रह्मोस आपल्या सुपरसोनिक गती, अचूकता आणि मल्टी-प्लॅटफॉर्म क्षमतेसाठी ओळखले जाते.
हे भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिरोध सिद्धांतानुसार कार्य करते. मोठ्या भागाचा नाश करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राइक करण्याची क्षमता याला अधिक खास बनवते. या क्षेपणास्त्राचा संयुक्त विकास भारताची संरक्षण स्वायत्तता आणि जागतिक भागीदारी, विशेषतः रशियासोबतचे संबंध दर्शवतो. ब्रह्मोस केवळ एक लष्करी हत्यार नाही, तर जागतिक स्तरावर भारताची सांस्कृतिक ओळख आणि धोरणात्मक इराद्याची झलक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world