मेहबूब जमादार, रायगड: रायगडच्या खालापूर, सुधागड, अलिबाग, महाड सह अन्य भागात रात्रभर पावसाने जोरदार बॅटींग केल्याने संपूर्ण रायगड जलमय झाले आहे. कुंडलिका नदी, आंबा नदी व पाताळगंगा नद्या इशारा पातळीच्या वरून वाहताना पहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुधवारी संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रायगडमधील कुंडलिक व पातळगगा दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांड्याचे पावस मिळत आहे. परंतु नागोठणे येथील आंबा नदीवरील पुल हा धोकादाय झाला असल्याने या ठिकाणाहून वाहतूक बॅरिकेट लावून बंद करण्यात आलेली आहे. तर रोहाच्या कुंडलिका नदीच्या दोन्ही पुलावरून वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे. परंतु पाऊस प्रचंड असल्याने नद्यांच्या पाणी पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच पावसाचा प्रमाण वाढत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयातून रोहा तळा महाड पोलादपूर या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे.
खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून कामगारांना ही कामावर न जाण्याचे आदेश दिले आहेत तर गरज असेल तरच नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुंडलिक व पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सावित्री आंबा, उल्हास व गाढी नदीने अद्याप इशारा पातळी पेक्षा कमी ने वाहत आहे.
(नक्की वाचा- Rain Alert : राज्यातील या 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; मुंबई-पुण्यात आज पावसाचा काय आहे अंदाज?)
जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याने अद्याप कुठेही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र जिल्हा प्रशासनाने काही भागात शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली असून कामगारांना ही कामावर न जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुणे (घाट परिसर), सातारा, रत्नागिरी, रायगड या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे.
Bharat Gogawale: रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा? नवा VIDEO समोर