Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार! राज्यातील 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा हवामान अंदाज

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर कायम असून आज हवामान विभागाने आज १५ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Alert:  जून महिना संपत आला तरी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. यंदा मान्सूनची उशिरा एन्ट्री झाल्याने पावसाने दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर कायम असून आज हवामान विभागाने आज १५ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. 

US- Iran: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले

१५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, हवामान विभागाने आज (दि. २७) राज्यासाठी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मान्सूनचा प्रवास सक्रिय झाल्यामुळे राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच विमानात ; मुख्यमंत्री पुढे आले अन् हस्तांदोलन करताना नक्की काय बोलले?

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.