मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! तेजस्विनी पंडितची इन्स्टा पोस्ट चर्चेत

'इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो' असं म्हणत तेजस्विनीने राज ठाकरे यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळली आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा देखील समावेश आहे. तेजस्विनीने राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 'इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो' असं म्हणत तेजस्विनीने राज ठाकरे यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळली आहेत.

(ट्रेडिंग न्यूज: जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं? राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी)

तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय "प्रिय राजसाहेब हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता ! साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकांविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही , किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा ! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼 मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! हसत रहा साहेब 🩷 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

तेजस्विनी पंडित ही राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ कायम पोस्ट करत असते. मार्च महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळेसही तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मनसेला आणि राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की,  "18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची...पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा."

Advertisement

तेजस्विनीने पुण्यामध्ये एक आलिशान सलॉन सुरू केलं आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणाऱ्या या सलॉनचे नाव 'एम टू एम' असं ठेवण्यात आलं आहे. या सलॉनचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यावेळीही तेजस्विनीने एक पोस्ट लिहिली होती ज्यात तिने म्हटलं होतं की, 'माननीय राज ठाकरे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार!'

PM Modi and Meloni Meet | तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी आणि मिलोनींची पहिली भेट

Topics mentioned in this article