Don Ashwin Naik: 'राज ठाकरे- उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं...', मुंबईतील कुख्यात गँगस्टरची इच्छा

90च्या दशकात मुंबई शहरात गँगवारचा भडका पाहायला मिळायचा. त्याकाळात मुंबईमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पाच मोठ्या गँगपैकी एक गँग म्हणजे अश्विन नाईक गँग...

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई:  'राजकारणामध्ये जर आपली स्थिती सुधारायची असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे.. असे म्हणत मुंबईमधील अंडरवर्ल्ड डॉन डॉन अश्विन नाईक यांनी व्यक्त केले आहे.  एनडीटीवीचे प्रतिनिधि जितेंद्र दीक्षितला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी गणेश नाईक यांनी 90 च्या काळातील मुंबईच्या गँगवॉरचा अनुभवही सांगितला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

90च्या दशकात मुंबई शहरात गँगवारचा भडका पाहायला मिळायचा. त्याकाळात मुंबईमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पाच मोठ्या गँगपैकी एक गँग म्हणजे अश्विन नाईक गँग. अश्विन नाईकचा मोठा भाऊ अमर नाईक उर्फ रावण याला 1996 मध्ये इन्स्पेक्टर विजय सालसकर यांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. एनडीटीव्हील दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या अंडरवर्ल्डमधील एन्ट्रीचा किस्सा सांगितला.

 'अंडरवर्ल्ड हा एक वनवे प्रवास आहे, तुम्ही ठरवूनही त्यातून बाहेर पडू शकत नाही. मी नशीबवान आहे, त्यातून बाहेर पडलो. आता गँगवॉरही संपले आहे. मलाही राजकारणात यायचे होते, पण त्याचवेळी माझ्यावर हल्ला झाला. सध्या अश्विन नाईक यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही.' मात्र, ते राजकीय घडामोडींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्याने सांगितले. 

नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे  दोघांनी एकत्र यावे, असं मला आजही वाटते. वेगवेगळं लढून काही फायदा नाही. एकत्र राहिले तर ताकद वाढेल, आपआपासतात लढून काही फायदा होणार नाही, असं अश्विन नाईक म्हणाला. तसेच ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने खूप प्रभावित होते. बाळासाहेबांनाही ते आवडत आणि दोघांमध्ये अनेकदा भेटी झाल्या होत्या,' असा खुलासाही त्याने यावेळी केला. 

दरम्यान, '1994 मध्ये अश्विन नाईक अंडरवर्ल्डची दुनिया सोडून राजकारणात येण्याच्या तयारीत होता. त्यांची पत्नी नीता नाईक यांच्याप्रमाणे तोही शिवसेनेत प्रवेश करणार होता. मात्र, अरुण गवळीच्या शूटर्सनी त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यात गोळी लागल्यानंतर त्यांना कंबरेखाली पक्षाघात (लकवा) झाला आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलल्याचे त्याने सांगितले.