जाहिरात

Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

Aarushi Pokhriyal Nishank fraud of 4 crores : माजी मुख्यमंत्र्यांची लेक चित्रपटात काम करू इच्छित असून सोशल मीडियावर तिचे मोठे चाहते आहेत.

Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

Aarushi Pokhriyal Nishank : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची लेक आरुषि पोखरियाल निशंक (Former Chief Minister of Uttarakhand Ramesh Pokhriyal Nishank) हिला बॉलिवूड प्रेम महागात पडलं आहे. चित्रपट निर्मिती आणि प्रमुख भूमिका देण्याचं आमिष दाखवून तिची चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चित्रपट निर्मात्यासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात आरुषिचे वडील, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांना खोट्या प्रकरणात फसवणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचाही आरोप आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एसएसपी अजय सिंह यांना आरुषिने दिलेल्या माहितीनुसार, ती हिमश्री फिल्मच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसह अभिनयदेखील करते. मुंबईतील जुहूमध्ये राहणारे मानसी वरुण वागला आणि वरुण प्रमोद कुमार वागला या दोघांनी आरुषि हिची तिच्या डेहराडून घरात भेट घेतली होती. वागला यांनी आरुषिला सांगितलं होतं की, ते मिनी फिल्म प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख आहेत. ते 'आंखो की गुस्ताखिया' नावाच्या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

या चित्रपटात शनाया कपूर, विक्रांत मेस्सीसारखे मोठे कलाकार काम करणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी आरूषिला एक भूमिका ऑफर केली होती. याचवेळी त्यांनी आरुषिकडे पाच कोटी रुपये आपल्या फर्ममधील एका ओळखीच्या व्यक्तीकडे गुंतवण्यास सांगितलं होतं. या संपूर्ण प्रोजेक्टचा 15 टक्के म्हणजे 15 कोटींचा लाभ मिळण्याचं आमिषही दाखविण्यात आलं होतं.

Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?

नक्की वाचा - Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?

यानंतर आरुषिने एमओयूवर स्वाक्षरी केली होती. गेल्या वर्षी 10, 27, 30 ऑक्टोबर आणि 19 नोव्हेंबर 2025 मध्ये चार टप्प्यात चार कोटी रुपये देण्यात आले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी आरुषिला ना काम दिलं आणि नाही पैसे परत केले. आता त्यांच्याकडून धमकी दिली जात असल्याची माहिती आहे.