Rajgad News:अतिउत्साह अंगाशी? पर्यटन स्थळांवर निर्बंध असतानाही पुण्यातील 17 जण देवकुंड धबधब्यावर, दोघे बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यावर पुण्यातील १७ जण सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली आनंद घेत असताना यातील दोघं बुडून बेपत्ता झाले आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Rajgad News : पावसामुळे राज्यातील हिलस्टेशनवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यावर पुण्यातील १७ जण सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली आनंद घेत असताना यातील दोघं बुडून बेपत्ता झाले आहे. 

वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे?

मिळालेल्या माहितीनुसाक, माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले आहे. पुण्यातून १७ जणांचा चमू देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. धबधब्याखाली आनंद घेत असताना दोघे बुडून बेपत्ता झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. बचाव पथकांना बोलावण्यात आलं.  देवकुंड धबधब्यासह माणगावमधील वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Advertisement