"भुजबळच नाही नाराजांची यादी मोठी", राजू शेट्टी यांचा महायुती सरकारवर निशाणा

राजू शेट्टी यांनी पुढे म्हटलं की,  सर्व आनंदी आनंदच आहे. ज्यांना काही मिळाले नाही ते आपापल्या मतदारसंघात रुसून गेले आहेत. अशा पद्धतीने सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत. छगन भुजबळ एकटेच नाही तर नाराजांची यादी मोठी आहे. महायुती सरकारचे जनतेने दिलेले बहुमत आहे का दाखवलेले बहुमत आहे, अशी शंका निर्माण होते. असे वक्तव्य माझी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निवडणुकीचा निकाल लागून महिना होऊन गेला आहे. मुख्यमंत्री ठरायला वेळ लागला. खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे, मात्र खातेवाटप झाले नाही. हे तिघेच प्रश्नाचे उत्तर देणार होते तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करायचं कारणच काय होते, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)

राजू शेट्टी यांनी पुढे म्हटलं की,  सर्व आनंदी आनंदच आहे. ज्यांना काही मिळाले नाही ते आपापल्या मतदारसंघात रुसून गेले आहेत. अशा पद्धतीने सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. खरंतर  जनतेने याना खरोखर जनमत दिले आहे का? की अन्य मार्गाने सत्तेवर आले आहेत मला माहित नाही. जनतेने निवडून दिले असेल तर हा जनतेचा अपमान आहे. कारण अशा पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे. 

(नक्की वाचा - बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाचा अभिमान आणि सन्मान आहेत. बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेकजण संसदेत गेले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं वक्तव्य करणे देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे पंतप्रधान समर्थन करतात. बाबसाहेबांच नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय मला कळत नाही. त्याच्या मनात जी वळवळ आहे ती ओठातून व्यक्त झाली, असा घणाघातही राजू शेट्टी यांनी केला. 
 

Advertisement