जाहिरात

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांबाबत काँग्रेसकडून गेल्या 24 तासांमध्ये होत असलेल्या आरोपांना शाह यांनी उत्तर दिलं

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर
मुंबई:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांबाबत काँग्रेसकडून गेल्या 24 तासांमध्ये होत असलेल्या आरोपांना शाह यांनी उत्तर दिलं. अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कशी वागणूक दिली हे सर्व सांगितलं. त्यांनी आपलं भाषण चुकीच्या पद्धतीनं कापून जनतेमध्ये भ्रम पसरवल्याचा आरोप केला. अमित शाह यांच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे पाहूया  

( नक्की वाचा : 'काँग्रेस संविधानविरोधी पक्ष, अनेकदा आंबेडकरांचा अपमान केला', अमित शाहांनी दिलं उत्तर )
 

  1. काँग्रेसनं पुन्हा एकदा त्यांची जुनी पद्धत वापरली. त्यांनी गोष्टींचा विपर्यास करून आणि सत्याला खोट्याचा पोशाख करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे.
  2. संसदेमध्ये चर्चा होत होती त्यावेळी काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा कशा पद्धतीनं सर्व शक्तीनं विरोध केला, हे सिद्ध झालं.
  3. बाबासाहेबांच्या निधनानंतरही काँग्रेसनं त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला.
  4. संविधान सभेचं काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुका झाल्या. 1951-52 आणि 1954 साली झालेल्या दोन निवडणुकीत बाबासाहेबांना हरवण्याची कोणतीही कसर काँग्रेसनं सोडली नाही.
  5. ती मैत्रिपूर्ण निवडणूक होती. त्यानंतरही त्यांचा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांचा पराभव कसा होईल, हे काँग्रेस निश्चित केलं. 
  6. भारतरत्न पुरस्कारांच्या बाबतीतही तेच घडलं. काँग्रेस नेत्यांनी स्वत:लाच भारतरत्न दिले आहेत. 
  7. पंडित नेहरुंनी 1955 साली स्वत:ला भारतरत्न दिलं. इंदिराजींनी 1971 मध्ये भारतरत्न दिलं. 1990 साली बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार नव्हतं. ते भाजपानं पाठिंबा दिलेलं सरकार होतं. 
  8. 1990 सालापर्यंत बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळू नये यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले.
  9. इतकंच नाही तर बाबासाहेबांची 100 वी जयंती साजरी करण्यास काँग्रेसनं मनाई केली. 
  10. नेहरुजींचा आंबेडकरांबाबतचा द्वेष जगजाहीर आहे. पंडितजींच्या 'लेटर्स टू चीफ मिनिस्टर' या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. 
  11. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही स्मारक झालं नाही. दुसरे पक्ष सत्तेमध्ये आले त्यावेळी त्यांनी स्मारक बनवले.
  12. पीएम मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ पंचतीर्थ विकसित केले. 
  13. मला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगायचं आहे की, तुम्ही काँग्रेसच्या या नापाक प्रयत्नांना पाठिंबा द्यायला नको होता. 
  14. राहुल गांधी यांच्या दबावात तुम्ही यामध्ये सहभागी झाला याचं मला खूप दु:ख आहे. 
  15. भाजपा सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार. संसदेत आणि संसदेच्या बाहेर जी कारवाई केली जाऊ शकते, त्या सर्व शक्यतांवर विचार केला जाईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com