सुरज कसबे, पुणे:
Mumbai Pune Expressway Traffic: देशभरात रामनवमी मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. प्रभु श्रीरामांच्या जन्मदिवसाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असून अनेक शहरांमध्ये शोभायात्रा, मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. रामनवमी तसेच शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई- पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई- पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. चैत्र नवरात्रनिमित्त भाविक लोणावळा लगतच्या आई एकविरा देवीच्या गडावर निघालेत. अशातच आज रामनवमीची सुट्टी आहे. यानिमित्ताने मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडलेत. परिणामी द्रुतगती मार्ग मंदावला आहे.
बोरघाटात नेहमीप्रमाणे वाहतूक संत गतीने पुढं सरकत आहे. चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेऊन, वाहतूक सुरळीत केली जात आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच महामार्गावर होणाऱ्या या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात पुरेसा पेट्रोलचा साठा असूनही वाहन चालक पंपावर गर्दी करत आहेत. मावळ तालुक्यात, लोणावळा, कामशेत, वडगांव, तळेगांव आणि देहू देहूरोड परिसरात अद्याप तरी पेट्रोल ची टंचाई नाही मात्र पेट्रोल पंपावर हळूहळू गर्दी होऊ लागली असून प्रत्येकाला इंधनाची टंचाई निर्माण होती की काय ही भीती वाटू लागली आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
Pune Crime: पुण्यात व्यापाऱ्यासोबत भयंकर घडलं! भरदिवसा उचललं; मध्यरात्री पत्नीला कॉल अन् थेट...