4 days ago

माह-ए-रमजानच्या समाप्तीसह रविवारी दिल्लीत ईद-उल-फितरचा चंद्र पाहायला मिळाला. आज सोमवारी देशभरात मुस्लीम बांधवांमध्ये ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर आज त्यावर सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. 

Mar 31, 2025 20:16 (IST)

LIVE Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये काही घरांना आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लेखाना परिसरात आग 

अचानक काही घरांना लागली आज

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी

आगीची अग्निशमन दलाला देण्यात आली माहिती

Mar 31, 2025 19:59 (IST)

Live Update: सुरक्षा दलांची मोठी कारवाई, लाखोंचे बक्षीस असलेल्या एका माओवाद्यासह 13 सक्रिय माओवाद्यांना अटक

सुरक्षा दलांची मोठी कारवाई, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका माओवाद्यासह 13 सक्रिय माओवाद्यांना अटक................ 

उसुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथकावर आयईडी स्फोट घडवून आणणाऱ्या 7 माओवाद्यांना अटक, त्यांच्याकडून स्फोटके जप्त, उसुर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई.

बासगुडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटकेल येथील एका ग्रामस्थाच्या आणि मारुडबाका येथील एका ग्रामस्थाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सहा माओवादी आरोपींना अटक करण्यात आली. बासगुडा पोलिस स्टेशन आणि कोब्रा 210 ची संयुक्त कारवाई.

जिल्ह्यात सुरू असलेल्या माओवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून, उसूर पोलिस स्टेशन, कोब्रा 201, 205, 206, 210 आणि सीआरपीएफ 196 बटालियनचे संयुक्त पथक टेकमेटला येथे रवाना झाले होते. या कारवाईदरम्यान, पोलिस पथकाला संशयास्पद स्थितीत पाहून लपून पळून जाताना 07 संशयितांना पकडण्यात आले. चौकशी केली असता नक्षली असल्याचे निष्पन्न झाले....

Mar 31, 2025 19:05 (IST)

IPL 2025 MI Vs KKR: घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं जिंकला टॉस

आयपीएल 2025 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होतोय. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 31, 2025 17:43 (IST)

Washim Accident: हिंगोली- वाशिम रोडवर भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी

वाशिम महामार्गावरील माळहिवरा गावाजवळ कारचा भीषण अपघात झालाय, या अपघातात कारचा उजव्या बाजूचा टायर फुटल्याने भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडर हुन दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झालीय, या कारमधून चौघे जण वाशिम हुन हिंगोली कडे प्रवास करीत होते, त्या चौघांना ही  दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे......

Advertisement
Mar 31, 2025 17:15 (IST)

Beed unseasonal Rain: बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी ...

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

बीडच्या पाटोदा, गेवराई तालुक्यातील परिसरात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस...

या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे...

त्याचबरोबर शेतकऱ्याच्या उन्हाळी भाजीपाला पिकाला ही फटका बसणार आहे...

Mar 31, 2025 16:36 (IST)

LIVE Updates: शेत तळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, दुर्दैवी घटना

शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील सावखेड घडली. साई कुमावत व शुभम गोरे असे मृत्यू झालेल्या मुलांचे नावे आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.येवला दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही घटनेची माहिती मिळतातच त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत कुटुंबांचे सांत्वन केले.

Advertisement
Mar 31, 2025 16:34 (IST)

LIVE Update: मुंबई पोलीस कुणाल कामराच्या घरी

कॉमेडियन कुणाल कामराला समन्स बजावल्यानंतर आता मुंबई पोलीस त्याच्या शोधासाठी घरी गेल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 31, 2025 16:15 (IST)

Beed News: बीड कारागृहातील मारहाण प्रकरणाला नवीन वळण.. वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही

बीड कारागृहातील मारहाण प्रकरणाला नवीन वळण..

वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही 

कारागृहात वाद हा परळी तालुक्यातील कैदी वाघमोडे आणि सोनवणे यांच्यामध्ये झाला होता, मारहाण नव्हती 

मात्र या दोघातील वादाच्या अफवा काही लोकांनी वेगळ्या उडवल्या 

त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत 

असं स्पष्टीकरण बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सार मुलांनी यांनी फोनवरून बोलताना दिले आहे

Advertisement
Mar 31, 2025 16:00 (IST)

LIVE Updates: धामणगावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी..सामूहिक नमाज पठण

 मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फ़ित्र अर्थात रमजान ईद अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.. त्या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून ईदगाह  मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले.. सकाळी 8 पासून शहरतील ईदगाह मैदाना सह मदिना मस्जिद व  मस्जिद चिश्तिया उस्मानिया, चिश्तिया ताजिया  मशिदीमधून सामूहिक नमाज पठण करण्यास आले.. यावेळी जामा मज्जिद मरकसइमाम हाफिज अख्तर  यांच्या नेतृत्वामध्ये नमाज अदा करण्यात आली..यावेळी देशात अमान व शांतता राहावा अशी ही प्रार्थना यावेळी करण्यात आली.., ईदगाह मैदानावर   मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा  करून एकमेकांना ईदीचे शुभेच्छा दिल्यात..

Mar 31, 2025 15:59 (IST)

LIVE Update: पाबळ येथील शाळेत अनोळखी व्यक्तीचा शिरकाव, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सीसीटिव्ही कँमेरात दिसणा-या या व्यक्तीने ड्रायव्हर ला भेटण्याची निमित्त करुन शाळेत प्रवेश केला याच वेळी शाळेतील विद्यार्थी कुमार स्वरूप डफळ या विद्यार्थ्याविषयी सविस्तर माहिती घेतली व त्याला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, शाळेतील कर्मचाऱ्यांनी अधिकृत संमती घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगताच तो तिथून पलायन झाला.ही घटना लक्षात येताच शाळा प्रशासनाने पालकांना सतर्क केले आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mar 31, 2025 15:57 (IST)

LIVE Update: मनसेचा 3 एप्रिल ला एस आर ए कार्यालयावर धडक मोर्चा

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 3 एप्रिल ला एस आर ए कार्यालयावर धडक मोर्चा. 

 हजारोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिकांना या मोर्चात सहभागी होण्याचा आवाहन मनसे कडून करण्यात येते. 

मुंबईच्या रखडलेल्या एस आर ए प्रकल्प बाबत मनसेचा धडक मोर्चा. 

विशेषता वरळीतील सिद्धार्थ नगर प्रेम नगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास 28 वर्षापासून रखडला. 

या विरोधात मनसे आक्रमक होताना बघायला मिळेल

Mar 31, 2025 13:15 (IST)

Live Update : प्रशांत कोरटकर कळंबा कारागृहातील अंडासेलमध्ये

प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्यावर 10 सीसीटीव्हीची  नजर असणार आहे. कारागृहाच्या आतमध्ये 6 कॅमेरे आणि बाहेर चार कॅमेरे असतील. कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार आहे. 

Mar 31, 2025 11:58 (IST)

Live Update : बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद

बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद 

परळीतील महादेव गीते व सोनवणे नावाच्या आरोपीच्या गटात वाद 

शिवीगाळ व धक्काबुक्की होताच कारागृह कर्मचाऱ्यांकडून हस्तक्षेप

Mar 31, 2025 10:10 (IST)

Live Update : श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची अलोट गर्दी

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची अलोट गर्दी 

-श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा 

- प्रकट दिनाच्या निमित्ताने पहाटे 4 वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा 

- आंध्रप्रदेश, कर्नाटक,  मध्यप्रदेश तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त दाखल 

- प्रकट दिनानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट तसेच द्राक्ष्याची आरस करण्यात आली 

 - प्रकट दिनाच्या निमित्ताने आज दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

Mar 31, 2025 09:31 (IST)

Live Update : अर्धमसला गावात इफ्तारच्या वेळी सामाजिक एकतेचं दर्शन, स्फोट झालेल्या मशिदीमध्ये सर्वांनी एकत्रित केला इफ्तार

बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मशिदमध्ये स्फोटाची घटना घडली होती. यानंतर गावकऱ्यांनी एकत्रित येत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. काल सायंकाळी त्याच मशिदीमध्ये एकत्रित येत इफ्तार केला. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, शेख निजाम यांच्यासह हिंदू मुस्लीम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Mar 31, 2025 07:50 (IST)

Live Update : गोकुळच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

गोकुळच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ झाली असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दरवाढीची घोषणा केली. मंगळवारपासून हा वाढीव दर लागू होईल. गोकुळ शिरगाव येथील दुधप्रकल्पवरील पेट्रोल पंपाच्या उदघाट्नावेळी मुश्रीफ यांच्याकडून माहिती

Mar 31, 2025 07:49 (IST)

Live Update : गुढीपाडव्यानिमित्त इंदापूरात शिवभक्तांचा कावड जल्लोष !

गुढीपाडव्याच्या शुभ दिनानिमित्त इंदापूरात सायंकाळी शिवभक्तांनी उत्साहात कावड यात्रा काढली. खांद्यावर पाणी भरलेल्या कावडी घेऊन शिवभक्तांनी "हर हर महादेव" च्या जयघोषात आणि ढोल-ताशाच्या निनादात शहराला प्रदक्षिणा घातली. फुलांची उधळण आणि जल्लोषात शहरातील विविध ठिकाणी कावडधारकांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले.

Mar 31, 2025 07:48 (IST)

Live Update : खराब हवामानामुळे सांगोल्यात कोसळलं पॅराशूट

हैदराबाद येथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी अवकाशात सोडण्यात आलेले टेलिस्कोपसह पॅराशूट खराब हवामानामुळे भरकटून सांगोल्यातील खडतरे गल्लीतील मानवी वस्तीत तर एक पॅराशूट सांगोल्यापासून जवळ असलेल्या खारवटवाडी येथे कोसळले. या दुर्घटनेत तीन वाहनांचे नुकसान झाले. टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबई शाखा हैदराबाद येथून दीड टनी वजनाचा एक टेलिस्कोप यंत्रणेसह अर्धा टन वजनाचे दोन पॅराशुट खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शनिवारी रात्री ९वाजता अवकाशात सोडले होते.