राकेश गुडेकर, रत्नागिरी:
Chiplun Crime: एकीकडे महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच चिपळूणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूणमध्ये भाजप युवा कार्यकर्त्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोस्को अंतर्गत कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भाजप कार्यकर्त्यावर अत्याचाराचा गुन्हा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिपळूणमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मंदार मंगेश कदम असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने १४ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप असून पोस्को अंतर्गत कारवाई झाली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
Baramati Crime: शेतकऱ्यांनो सावधान! पुरंदर विमानतळाच्या नावाखाली मोठी फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
कदम याने १४ वर्षीय बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने ती उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दाखल झाली. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीला पोलीस कोठडी
दरम्यान, याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयित आरोपी मंदार कदम याला चिपळूण पोलिस यांनी ताब्यात घेतले. सद्यस्थितीत चिपळूण पोलिस ठाण्याच्या पोलिस कस्टडीत आहे. प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणे कडून सुरू असून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
Navi Mumbai Crime: 'मतदान झाले, मी तुझा तू माझी...' महिलेसोबत भयंकर घडलं; 2 घटनांनी नवी मुंबईत खळबळ