जाहिरात

Baramati Crime: शेतकऱ्यांनो सावधान! पुरंदर विमानतळाच्या नावाखाली मोठी फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी आरोपी निलेश थोरात याला अटक केली आहे.

Baramati Crime: शेतकऱ्यांनो सावधान! पुरंदर विमानतळाच्या नावाखाली मोठी फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

देवा राखुंडे, बारामती:

Baramati Fraud: सासवड भागात सुरु असलेल्या पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांना गंडा घालून जेसीबी मशीन व ट्रॅक्टर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी आरोपी निलेश थोरात याला अटक केली आहे.

पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक..

समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जेसीबी मशीन भाड्याने घेऊन “सासवड येथे सुरू असलेल्या नव्या विमानतळाच्या कामासाठी वापर करणार” असे सांगत करारनामा करून सदर वाहने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या गुन्ह्यात अजय संतोष चव्हाण (रा. सरतळे, जि. सातारा), दिनेश भाऊराव मोरे (रा. नायगाव, जि. नांदेड),निलेश अण्णा थोरात (रा. मोरगाव, ता. बारामती) आणि तुषार शहाजी शिंदे (रा. येडशी, जि. धाराशिव) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Navi Mumbai Crime: 'मतदान झाले, मी तुझा तू माझी...' महिलेसोबत भयंकर घडलं; 2 घटनांनी नवी मुंबईत खळबळ

या प्रकरणी शेतकरी बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३३६, ३९८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बी.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांशी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा केला. दरमहा एक लाख रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून जेसीबी ताब्यात घेऊन त्यांची परस्पर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

3 ट्रॅक्टर, 2 जेसीबी जप्त

तपासादरम्यान आरोपी निलेश थोरात याच्याकडून नांदेड येथील ३ जेसीबी, धाराशिव येथील २ ट्रॅक्टर, तसेच कळंब पोलीस स्टेशन गुन्ह्यातील एक ट्रॅक्टर असा एकूण ३ जेसीबी व २ ट्रॅक्टर (किंमत अंदाजे ७७ लाख रुपये) हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी निलेश थोरात यास अटक करण्यात आली असून त्यास पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

Pune News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली

पोलिस कोठडीत असताना आरोपीने मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे ट्रॅक्टर असल्याचे खोटे सांगून ट्रॅक्टर विक्री केल्याचीही कबुली दिली आहे. या यशस्वी कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांच्यासह सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com