Ratnagiri News : पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं! लाखोंचा गंडा, रत्नागिरीच्या तरुणाची फसवणूक

Ratnagiri Crime News : मोरोशी गावातील 28 वर्षीय तरुण लवेश यशवंत कानडे  याची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने 4 लाख 90 हजार 906 रुपयांची फसवणूक झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Ratnagiri Crime News : पोलीस होण्याच्या स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुणाचं स्वप्न भंगलं आहे. पोलीस भरतीच्या नावाखाली तरुणांची पाच लाखांचा फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील मोरोशी गावातील तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोरोशी गावातील 28 वर्षीय तरुण लवेश यशवंत कानडे  याची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने 4 लाख 90 हजार 906 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सिंधुदुर्गतील ज्ञानेश पांचाळ याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा-  हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!)

लवेश यशवंत कानडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यानुसार ज्ञानेश पांचाळ याने लवेश याला विजय सुतार नावाचा आर्मी ऑफिसर ओळखतो आणि तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे भासवले. यानंतर पांचाळने डिसेंबर 2020 ते 12 ऑगस्ट 2024 या दरम्यान वेळोवेळी गुगल पेद्वारे फिर्यादीकडून एकूण 4 लाख 90 हजार 906 रुपये घेतले. 

(नक्की वाचा-  Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य)

लवेश कानडे याने पांचाळ याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता, तो टाळाटाळ करत होता. आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देत होता. अखेरीस त्रस्त होऊन लवेश कानडे याने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्ञानेश पांचाळ याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article