Ratnagiri News: आठवीतल्या सर्वेशचं असामान्य धाडस! पोलीस दलही चक्रावलं; प्रशस्तीपत्राने सन्मान

कौतुकाची थाप देऊन या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे  रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी:

Ratnagiri News:  रत्नागिरी तालुक्यातील  तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथील  इ. ८ वी मध्ये शिकत असलेल्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे यांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते कौतुकाची थाप देऊन या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे  रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखी सोहळ्यात अजितदादांची एन्ट्री! एकच वादाची घोषणा अन् सेल्फीसाठी गर्दी, प्रकार काय?

आठवीतील सर्वेशचा भीम पराक्रम...!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोर घुसून चोरी करत असल्याचे कु.सर्वेशच्या दृष्टीस आले त्यानंतर सर्वेशने मोठ्या कौशल्याने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या चोराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर त्याने चोरी झालेल्या मालकाला फोनवरती माहिती देऊन त्या चोराचा मोटर सायकलवरून घर मालकासमवेत धैयाने पाठलाग करत निवळी येथे गाठले. चोरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले तू कोठे जात आहेस? तो बोलला हातखंबा या ठिकाणी एका माणसाला भेटायला चाललो आहे.

Advertisement

सर्वेशचे एवढे धाडस की, जीवाची पर्वा न करता मी पण येतो असे सांगून त्या चोराच्या मोटरसायकलवर बसला. मागोमाग ज्यांच्या घरी चोरी झाली ती व्यक्ती होती. हातखंबा गाव संपल्यावर चोराने कु‌ सर्वेशला हळूच गाडीवरून खाली ढकळून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वेश मायंगडे याने नजिकच्या हातखंबा ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांच्या सदर चोरीची बाब निदर्शनास आणून देत पुरावा सादर केला. या चोराने दोन घरांतून सुमारे ४३ हजारांची रोकड लंपास केली होती. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर चोराला पकडून ताब्यात घेतले.

नक्की वाचा - Wari Special: वय वर्ष 81, सलग 41 वर्ष पायी वारी! आता ही तोच जोष, तोच उत्साह, वारकऱ्याची थक्क करणारी कहाणी