Ramdas Kadam: 16 वर्षांपूर्वीची सल पुन्हा बोलून दाखवली, रामदास कदम काय म्हणाले?

या मंडळींनी काही निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयामुळे संजय कदमला महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली असे रामदास कदम यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी: रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील चिंचघर गावातील श्री भैरवनाथ देवस्थान मंदिराचा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा  सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मनसेचे वैभव खेडेकर, माजी आमदार संजय कदम आदी उपस्थित होते. या सोहळ्याला शेकडो भाविक उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी 2009 मधील पराभवाचे पक्षावरच खापर फोडले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले रामदास कदम?

2009 मध्ये रामदास कदम यांचा गुहागर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. याबाबतच बोलताना रामदास कदम यांनी महत्त्वाचे विधान केले. जेव्हा एखादा पक्ष आपल्या नेत्याला पाडतो, मला त्यावेळी पाडलं गेलं अशी सल त्यांनी यावेळी बोलून दाखविली. या मंडळींनी काही निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयामुळे संजय कदमला महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली असे रामदास कदम यावेळी म्हणाले. तसेच योगेश कदम, संजय कदम दोन्ही मुले आमदार झाली तर मला अधिक आनंद होईल, भैरवनाथाच्या चरणी असं साकडं घातलं आहे.. वैभव खेडेकर यांचा मीच राजकीय गुरू आहे, मीच त्यांना राज ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो असही रामदास कदम यावेळी म्हणाले.

Advertisement

"मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या पाठीशी भैरवनाथा तू खंबीरपणे उभा रहा आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करून टाका. सीमेवर आमचा जवान आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा एकही जवान शहिद होता कामा नये असं साकडं शिवसेना नेते रामदास कदम यांनी श्री भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी भैरवनाथाला घातले.  या मंदिराचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे. शंभूराज देसाईंना कानात सांगितलं 1 कोटी देऊन टाका, एका क्षणात त्यांनी 1 कोटीची घोषणा केली, असंही कदम यावेळी म्हणाले.

नक्की वाचा - IPL सट्ट्याची चटक, तरुण बनला चोर ! लग्नाचं कार्ड दाखवून वृद्ध महिलेला...

दरम्यान योगेश दादा उदय सामंत यांच्याकडून किती निधी आणतात ते माहित नाही पण रामदास कदम जेवढी यादी देतो ती सर्व यादी मंजूर करणारे आणि फोनवर निमंत्रण स्वीकारून येणारे असे आमचे पालकमंत्री उदय सामंत. तसेच बाप से बेटा सवार हो सकता हे ज्यांनी दाखवून दिले ते योगेश कदम अशा शब्दांत रामदास कदम यांनी दोन्ही मुलांचे कौतुक केले. 

Advertisement

Topics mentioned in this article