टाटा हे नाव घेतले तरी आपल्या समोर उभं राहत ते रतन टाटा यांनी भारतासाठी केलेले अनेक सामजिक कार्य. टाटा यांचे कार्य हे भारतासाठी उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्यामुळे अहमदनगरचा रवी पाटोळे हा त्यांचा जबरा फॅन झाला आहे. त्यामुळेच त्याचा आणि टाटांचा रोजच्या जिवनात वावरताना रोजच संबध येतो. त्याला कारणही तसेच आहे. रवी पाटोळे हा सकाळी उठल्यावर चहा टाटाचा, घरात वापरले जाणारे मीठ टाटाचे, डिश टीव्ही सुद्धा टाटाचीच एवढंच काय तर त्याची गाडी सुद्धा टाटाचीच वापरतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशेष म्हणजे रवी यांनी लग्नाच्या वेळी त्यांनी त्यांच्या बायकोला एक फोन गिफ्ट केला होता. तो फोन ही टाटाचाच होता. रवी यांनी आता एक गाडी घेतली आहे. ही गाडी देखील टाटाचीच आहे. मात्र त्यांनी या गाडीवर 'टाटा THE PRIDE OF INDIA' असं लिहीलं आहे. हे फक्त मराठी किंवा इंग्रजी मध्ये लिहीलेलं नाही तर जगातील 57 भाषेत लिहीले आहे. त्याचे स्टिकर त्यांनी गाडीवर लावले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार
रवी पाटोळे यांनी पहिली गाडी घेतली ती ही टाटा कंपनीचीच होती. आताची नवी गाडी ही टाटा कंपनीचीच घेतली आहे. टाटांचे कार्य आणि कर्तुत्व पाहात रवी यांना 'टाटा the pride of india' हे वाक्य सुचलं. त्यानंतर त्याने हे वाक्य जगातल्या 57 भाषेत प्रिंट करून आपल्या गाडीला चिटकवले आहे. रवीच्या गाडीवर रतन टाटा यांचा फोटो लावला आहे.त्यामुळे त्याची गाडी आणि पाटोळे जिथे जातात तिथे चर्चा ही टाटा यांची होते.
ट्रेंडिंग बातमी - दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?
रवी पाटोळे यांच्या पत्नी सुरेखा पाटोळे आहेत. त्याही आता टाटांच्या फॅन झाल्या आहेत. घरात ज्या वस्तू लागतात त्या सर्व त्या टाटा कंपनीच्याच घेतात असं त्या आवर्जून सांगतात. टाटां बाबतचा असलेला हा आदर आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. पती बरोबरच त्याही आता टाटांच्या फॅन झाल्या आहेत.