जाहिरात

मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार

पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार
मुंबई:

मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत सकाळपासून पावसाची बॅटींग 

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस होत आहे. शिवाय पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पाहाटे पासून होणाऱ्या पावसामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. शिवाय सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी सब वे, कुर्ला स्थानका बाहेरही पाणी साचले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता गरज असल्यासच घरा बाहेर पडावे असे सांगण्यात आले आहे.  मुंबईत जवळपास शंभर मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई प्रमाणे नवी मुंबईतलाही पावसाने झोडपले आहे. ठाणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य रेल्वे देखील पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा धावताना दिसत आहेत. नागरिकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी -  एसटी चालवताना चालकाला आली फिट, गाडीवरचा ताबा सुटला अन्... 

कोकणातही धो- धो बसरणार 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही पावसाने झोडपले आहे. शिवाय या जिल्ह्यांनाही दक्षचेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून कोकणात दमदार पाऊस होत आहे. मात्र त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणा प्रमाणे गोव्यातही पाऊस धो-धो बसणार आहे. तिथेही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?

नागपुरात शाळांना सुट्टी 

नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा मध्ये विजेच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस सुरू आहे.  पुढील तीन तास मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यांसह या जिल्ह्यांत  जोराच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभरात नागपूर सह भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वीज पडण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान  उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी वाहणार आहे. 
मराठवाड्यात ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

(नक्की वाचा -  ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले)

पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली 

कोल्हापुरात पावसाने जोर धरला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतेय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटावर आहे. तर जिल्ह्यातील 74 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसान जोर धरल्यामूळ अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
मध्य रेल्वेवर तब्बल 22 तासांचा पॉवर ब्लॉक, अनेक गाड्या रद्द
मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार
mumbai-university-senate-elections-to-proceed-as-planned-on-september-22-high-court
Next Article
Mumbai University Senate Election : हायकोर्टाचा विद्यापीठाला दणका, निवडणुकीबाबतचा आदेश रद्द