"छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा", मराठा क्रांती मोर्चाची मागणी

संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्रिपदावर राहून मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात एखाद्याला आंदोलनाला बसवत असेल. तर अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आता मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचे काम आता छगन भुजबळांनी करू नये, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर आता छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. 

(नक्की वाचा- 'कुछ लोक अपनी औकात भूल गए है...'OBC आरक्षणावर भुजबळांचा घणाघात)

जो व्यक्ती संविधानिक पदावर बसून कोणत्याती जाती-धर्मात आकस निर्माण करणार नाही अशी शपथ घेतो. तोच मंत्री एखाद्या समाजात जातीय तेढ निर्माण करत असेल,  मराठा समाजाला टार्गेट करणे आणि मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करत असेल तर हे योग्य नाही. अशी कृत्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात ठेवू नये, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी केली.

( नक्की वाचा : लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा )

संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्रिपदावर राहून मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात एखाद्याला आंदोलनाला बसवत असेल. तर अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अन्यथा त्यांना राज्यभर फिरू देणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

Topics mentioned in this article