दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्येकाचेच साकार होते असं नाही. त्यात सर्व सामान्य नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं म्हणजे मोठे दिव्यच म्हणावे लागेल. परदेशे पाहूणे, त्यानंतर होणारी परेड, वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ हा सर्व सोहळा आपल्या डोळ्यात साठवता यावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. ज्यांना शक्य होत नाही ते टीव्हीवर याचा आनंद घेतात. यावेळी महाराष्ट्रातील हिंगोलीत शेतकऱ्याला या सोहळ्याला उपस्थित रहाता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
हिंगोली जिल्ह्यातील खानापूर चिता येथील शेतकरी राम जाधव यांना एक खास निमंत्रण आलं आहे. हे निमंत्रण थेट पंतप्रधान कार्यालयातून आलं आहे. हे निमंत्रण खास याच्यासाठी आहे कारण त्यांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार आहे. त्याचच निमंत्रण त्यांना देण्यात आलं आहे. हे निमंत्रण मिळाल्यानंतर ते जाधव हे भलतेच खुश आहेत. त्यांनी आपला आनंद व्यक्त करताना आपल्यासाठी हा मोठा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय ते दिल्लीसाठी रवानाही झाले आहेत.
राम जाधव या शेतकऱ्याला प्रधानमंत्री कार्यालयातून निमंत्रण आलेले आहे. राम जाधव हे महाराष्ट्रातून एकमेव शेतकरी आहेत, ज्यांना हे निमंत्रण आलेलं आहे. त्यांनी पी एम किसान योजनेच्या 19 वा हप्त्यासह इतर किसान योजनाचा लाभ घेतला आहे. त्यामुळेत त्यांना हे निमंत्रण आल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या असलेल्या योजना कशा फदायी आहेत. त्या योजनांचा आपण लाभ ही घेतल्याचे ते सांगतात. शिवाय त्यामुळे आपल्याला फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्या मनीध्यानी नसतानाही आपल्याला दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण मिळाल्याचं ते म्हणाले.
26 जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहातील. शिवाय विदेशी पाहूणेही या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. यावेळी भारताच्या ताकदीचं दर्शनही जगाला होता. शिवाय विवीधतेत एकता याचं प्रदर्शनही वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून होत असतं.