Pune Crime: समाजाला दिशा देणाऱ्या गुरुजींचा काळा धंदा! पोलिसांनी केला पर्दाफाश, जुन्नरमध्ये मोठी कारवाई

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या शेतात बाजरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केली होती. मात्र, पोलिसांच्या एका 'सर्जिलक स्ट्राईक'मुळे या गुरुजींचा हा काळा धंदा आता चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे:

Pune Junnar Crime:  ज्या शिक्षकाने समाजाला दिशा द्यायची असते, त्याच एका निवृत्त मुख्याध्यापकाने चक्क गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील खटकाळे गावात उघडकीस आला आहे. एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या शेतात बाजरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केली होती. मात्र, पोलिसांच्या एका 'सर्जिलक स्ट्राईक'मुळे या गुरुजींचा हा काळा धंदा आता चव्हाट्यावर आला आहे.

Purandar Airport: पुरंदरच्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली! कोट्यवधी रुपये, झाडांना वेगळा मोबदला, काय काय मिळणार?

शिक्षकाचा काळा धंदा उघड 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  समाजाला सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम ज्यांच्या खांद्यावर असते, त्याच एका निवृत्त मुख्याध्यापकाने चक्क गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील खटकाळे गावात उघडकीस आला आहे. एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या शेतात बाजरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केली होती. मात्र, जुन्नर पोलिसांनी केलेल्या एका ‘सर्जिकल स्ट्राईक'मुळे या शिक्षकाचा हा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, खटकाळे गावातील या निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या शेतात कोणालाही संशय येऊ नये अशा बेतात बाजरीच्या पिकात तब्बल १८ गांजाच्या झाडांची लागवड केली होती. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ३७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ज्या गुरुजींनी विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवली, त्यांनीच कायद्याचा भंग केल्याने परिसरात मोठी खळबळ माजली असून, संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Beed News : बाळ 22 तासांपूर्वी गर्भातच गेलं, आई तशीच फिरत राहिली; बीडमधील हादरवणारी घटना!