Rupali Chakankar: "अहंकार धुळीस मिळेल, Wait and Watch..." रुपाली चाकणकरांना कुणी दिला इशारा?

या संपूर्ण प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohini Khadse On Rupali Chakankar:  नाशिकचा अत्याचारी भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरातची संगत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलीच महागात पडली आहे. अशोक खरात प्रकरणी नाव आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही गेले. या संपूर्ण प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

रोहिणी खडसेंनी डिवचले! 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरून रुपाली चाकणकर यांना डिवचले आहे. “ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली… त्यामुळे जास्त उडायचं नसतं, असा टोला लगावला आहे.

Advertisement

Ashok Kharat: अशोक खरातचा दगडी बंगला चर्चेत! राजकीय नेते अन् सेलिब्रिटीही यायचे, 'ब्रम्हसदन'चा Video व्हायरल

तसेच  “गर्वाचे घर नेहमीच खाली असते, आता काही लोकांना हे समजलं असेल… अहंकार धुळीस मिळेल” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्या वर निशाणा साधला. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी केवळ राजीनाम्यावर न थांबता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुषमा अंधारेंचा सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा 

दरम्यान, यावरुनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागताचा आहे मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं... दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली.. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!