Sachin Pilgaonkar Viral Video: सचिन पिळगावकरांचा आणखी एक दावा, ट्रोलर्स म्हणतायत सोडियम लेव्हल चेक करा

Sachin Pilgaonkar Viral Statement: सचिन पिळगांवकर हा दावा करत असताना त्यांची मुलगी श्रिया हिच्या चेहऱ्यावर हे सगळे अविश्वसनीय असल्याचे हावभाव होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये, वेबसिरीजमध्ये काम करणारे अभिनेते सचिन पिळगावकर हे आपल्या विधानांमुळे गेली काही वर्षे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अमजद खान, धर्मेंद्र या दिवंगत अभिनेत्यांबद्दल त्यांनी केलेली विधाने ही फारच गाजली होती. त्यांची विधाने ऐकून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात असतं. यातच सचिन पिळगावकर यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आणखी एक दावा केला असून यामुळे ट्रोलर्स पुन्हा एकदा चेकाळले असून त्यांनी सचिन पिळगांवकरांना उद्देशून बरंच काही बोलण्यास सुरूवात केली आहे.

नक्की वाचा: "नात 'नव्या' हिने लग्न करू नये", जया बच्चन यांचं लग्नाविषयी मोठं वक्तव्य

9 वर्षांचा असताना गाडी घेतल्याचा सचिन पिळगावकरांचा दावा

सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना एक दावा केला आहे. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर ही देखील त्यांच्यासोबत गाडीमध्ये होती. गाडी आणि ड्रायव्हिंगवरून विषय निघताच सचिन म्हणाले की, "मी 9 वर्षांचा होतो, त्यावेळी हा सि-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडीत (दादर) राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क भागात येतो. मी 9 वर्षांचा होतो जेव्हा मी सगळ्यात पहिली गाडी खरेदी केली." सचिन पिळगावकर यांनी केलेला हा दावा अनेकांना पटलेला नाही. सचिन पिळगांवकर करत असलेले दावा हे निव्वळ थापा असतात असा दावा अनेक ट्रोलर्स करत असतात. सचिन पिळगांवकर यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, "सकाळी सकाळी हे बघून खूप हसलो राव...मेट्रो मध्ये शेजारी बसलेला तरुण सुधा खूप हसत होता.... गाडी गाडी पेट्रोल डालने वाली गाड़ी... लेक सुद्धा वैतागली असेल असल्या महागुरुला.... असो..."

दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, "आपण 9 वर्षाचे असताना आपल्या पप्पांनी आपल्याला सायकल पण न्हवती घेतली."

तर अन्य एकाने म्हटले आहे की,"सचिन यांनी सोडियम लेव्हल चेक केली पाहीजे."

9 वर्षांचा असतानाच गाडी चालवायला शिकल्याचा सचिन पिळगांवकर यांचा दावा

सचिन पिळगावकर हा दावा करत असताना त्यांची मुलगी श्रिया हिच्या चेहऱ्यावर हे सगळे अविश्वसनीय असल्याचे हावभाव होते. तिने मुलाखतकाराच्या खांद्यावर हात मारत जे हातवारे केले त्यावरून तिला या गोष्टी अकल्पनीय असल्याचे वाटत होते. सचिन यांनी 9 व्या वर्षी घेतलेल्या गाडीबद्दल बोलताना म्हटले की, "'मॉरीस मायनर'ला बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते." मुलाखतकाराने म्हटलं म्हणजे ही पूर्ण गाडी होती. यावर सचिन यांनी म्हटलं की, हो पूर्ण गाडी होती, पेट्रोलवर धावणारी. मुलाखतकाराने पुढे सचिन यांना प्रश्न विचारला की मग तुम्ही गाडी कशी चालवायचात, यावर सचिन यांनी म्हटले की, 'तेव्हा ड्रायव्हर होता, मी 9 वर्षांचा असताना, वरळी सीफेसवर त्याच गाडीतून गाडी चालवायला शिकलो.'

नक्की वाचा: सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना क्षितिजचं सणसणीत उत्तर; सांगितली दुसरी बाजू

Topics mentioned in this article