Jaya Bachchcan on Marriage : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी लग्नाबद्दल आपलं मत मोकळेपणाने मांडले. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जया बच्चन 'वी द वुमन'च्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांची नात नव्या नवेली नंदा हिने लग्न करू नये असे वाटते. नव्या नवेली नंदा 28 वर्षांची होणार आहे. यावेळी त्यांनी लग्नाची तुलना 'दिल्लीचा लाडू' या म्हणीशी केली. त्या म्हणाल्या, "लग्नाचा लाडू खाल्ला तर अडचणीत फसणार आणि नाही खाल्ला तर पश्चाताप होणार." त्यांनी लग्नाची संकल्पना 'आऊटडेटेड' झाली असल्याचे मत व्यक्त केले.
नव्याने करिअर सोडू नये
नव्याने लग्नानंतर करिअर सोडावे का, या प्रश्नावर जया बच्चन यांनी नाही असं उत्तर दिले. त्या म्हणाल्या, माझी इच्छा नाही की नव्याने लग्न करावं. आजकालची मुले कोणालाही 'आऊटस्मार्ट' करू शकतात. आजकालची मुले खूप हुशार आहेत आणि अनेक गोष्टी आधीच शिकून येत आहेत.
(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
शारीरिक आकर्षण
त्यांनी पुढे म्हटले, लोक कदाचित माझ्या बोलण्यावर आक्षेप घेतील, पण शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता खूप महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या काळात हे करून पाहू शकलो नाही, पण आजकालची पिढी हे करू शकते आणि त्यांनी का करू नये? दीर्घकाळ नातेसंबंध टिकवण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे."
लग्नापूर्वी मूल जन्माला घालण्याबद्दल जया बच्चन यांनी म्हटलं की, प्रेम ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. महिलांनी मुलांचे संगोपन कसे करावे यावर माझे मत आजच्या पिढीपेक्षा वेगळे असू शकते, कारण सध्याची पिढी खूप स्मार्ट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world