Pune VIDEO: थरारक पाठलाग, भयंकर शेवट! पोलिसांच्या भितीने पळाला, इमारतीवरुन पडून जीव गेला, हृदयद्रावक व्हिडिओ

suspect falls from tall building Viral Video: पोलिसांच्या कारवाईदरम्यान संशयित उंच इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Viral Video:  पोलिसांच्या कारवाईदरम्यान पाठलाग सुरु असताना इमारतीवरुन पडून आरोपीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा तरुण कोणत्या गुन्ह्यातील आरोपी होता? नेमकं काय प्रकरण होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही..

नेमकं काय घडलं? 

पुण्यात सुरू असलेला एक थरारक पाठलाग अत्यंत दुर्दैवी वळणावर संपला. पोलिसांच्या कारवाईदरम्यान संशयित उंच इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Advertisement

Ajit Pawar Accident: रोहित पवारांचाही VSR विमानातून प्रवास, दिग्गज क्रिकेटरसोबत बारामती दौरा, मोठी अपडेट समोर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी धोकादायक पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तो कोणत्याही सुरक्षेशिवाय इमारतीवर चढतो. त्याला पकडण्यासाठी पोलिस अधिकारी बाल्कनी आणि खिडक्या वापरून वर चढण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांना पाहून आरोपी प्रचंड घाबरतो. तो पुढचा मागचा कसलाही विचार न करता आधी इमारतीवर चढतो अन् पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा तोल जातो अन् तो थेट खाली कोसळतो. या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी अंत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरोपीला पकडण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य होती का असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीवर कोणतेही आरोप असले तरी, त्यांना जिवंत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. 

Pune News : पुणे महापालिकेत खळबळ! अधिकाऱ्यांसमोर एकाने डोक्याला पिस्तुल लावलं...पुढे काय घडलं?