जाहिरात

Pune News : पुणे महापालिकेत खळबळ! अधिकाऱ्यांसमोर एकाने डोक्याला पिस्तुल लावलं...पुढे काय घडलं?

पुणे महानगरपालिकेत भयानक घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा भागातील एका नागरिकाने अधिकाऱ्यांसमोर डोक्याला पिस्तुल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

Pune News : पुणे महापालिकेत खळबळ! अधिकाऱ्यांसमोर एकाने डोक्याला पिस्तुल लावलं...पुढे काय घडलं?
Pune Municipal Corporation Crime News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Municipal Corporation News :  पुणे महानगरपालिकेत भयानक घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा भागातील एका नागरिकाने अधिकाऱ्यांसमोर डोक्याला पिस्तुल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यात मोठी खळबळ माजली आहे.  सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. महापालिका अधिकाऱ्याला पिस्तूल दाखवून दमदाटीही केल्याची माहिती समोर आली आहे. कराची रक्कम भरण्यावरून वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागातील एका नागरिकाने आज महापालिकेच्या कर संकलन विभागामध्ये स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली.  महानगरपालिकेतील संगणक विभागातील अधिकाऱ्याला पिस्तुल दाखवून ही धमकी देण्यात आली.  ‘एवढा जास्त कर कसा असं‘ म्हणत इसमाने पिस्तुल काढलं. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

नक्की वाचा >> Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडणार? जमिनीच्या मोजणीला 'या' गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, कारण काय?

हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कर विभागात फेऱ्या मारत होता. त्याचा कर भरून घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत होते, असा आरोप त्याने केला आहे. आज अभय योजनेचा अखेरचा दिवस होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिकेत तो व्यक्ती सतत फेऱ्या मारत होता. त्याने त्याचे बिल काढण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने हे भयंकर पाऊल उचलल्याचं समजते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com