Shirdi Sai Baba : दुबईतून साईबाबांच्या चरणी भलंमोठं दान, भक्तांनाही पाहता येणार; किंमत पाहून भुवया उंचावतील

Donation to Shirdi Sai Baba : साईबाबा संस्थानाला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Donation to Shirdi Sai Baba : साईबाबा संस्थानाला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. साईबाबांच्या चरणी जात-धर्माचा भेद नसतो. सर्व जाती-धर्माच्या व्यक्ती अत्यंत भक्तीभावाने साईंच्या चरणी नतमस्तक होत असतात. साईबाबांना मोठ्या संख्येने दानही केलं जातं. भक्त आपल्या कुवतीनुसार बाबांना दान करीत असतात, गुरुवारीही एका भक्ताने बाबांना दान केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा भक्त दुबईतील असल्याचं समोर आलं आहे. 

बाबांना भलंमोठं दान...

गुरुवारीही साईंच्या गुरुवारी दुबई येथील एका साईभक्ताने साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे. या खिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात.

भक्तांनाही पाहता येणार...

या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संबंधित साईभक्तांचा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

 

नक्की वाचा - Mumbai News : गुन्हा करून थेट शिर्डी गाठायचे, साईबाबांना करायचे दान; पोलिसांनी 24 तासात मुसक्या आवळल्या

सोन्याची फ्रेम साईभक्ताकडून दान...

दुबईतील साईभक्ताकडून साई मंदिरातील दर्शन खिडकीस सुवर्ण नक्षीकामाची भव्य फ्रेम अर्पण करण्यात आली आहे. या फ्रेमची किंमत 55 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement