Sai Temple: शिर्डीला नाही तर 'या' गावात आहे भारतातले पहिले साई मंदिर, तुम्हाला हे गाव माहित आहे का?

दत्तादास माडये यांनी हे मंदिर बांधले होते. गुरुपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

गुरूप्रसाद दळवी 

गुरूपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या निमित्ताने अनेक भक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. साईबाबांची समाधी आणि मंदिर शिर्डीला आहे. पण अनेकांना हे माहित नाही की साईबाबांचे पहिले मंदिर हे शिर्डीत नाही तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधले गेले होते. असा दावा या मंदिराचे व्यवस्थापक राजन माडये यांनी केला आहे. आपल्या आजोबांनी हे मंदिर बांधल्याचं ते सांगतात. गुरूपौर्णिमेला या देशातील पहिल्या साई मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कविलगावमध्ये हे साई मंदिर आहे. हे एक पुरातन मंदिर असल्याचं राजन माडये यांनी सांगितलं. 1922 साली हे मंदिर बांधलं गेलं होतं. जवळपास 104 वर्षांचे हे मंदिर आहे. साईबाबांचा मृत्यू 1918 साली झाला होता. त्यानंतर हे मंदिर 1922 साली बांधलं गेलं. दत्तादास माडये यांनी हे मंदिर त्यावेळी बांधलं होतं. हे मंदिर बांधे पर्यंत देशात कुठेही साईबाबांचे मंदिर बांधले गेले नव्हते. त्यामुळे ते देशातील पहिले मंदिर असल्याचा दावा मांडये कुटुंबीय करत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Guru Purnima 2026 Wishes 28+: अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गुरुंना नमन, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

राजन माडये हे सध्या या मंदिराचे व्यवस्थापक म्हणून का करत आहेत. त्यांनी सांगितले की हे मंदिर एक पुरातन मंदिर आहे. 104 वर्षापासून हे मंदिर इथं आहे. तेव्हा पासून गुरूपौर्णिमा इथं साजरी होत आहे.  भक्ती भावाने साई भक्त इथं येत असतात. अभिषेक, पुजन सुरूवातीला केलं जाते. त्यानंतर नामस्मरण, आरती, महाप्रसाद देला जातो असं ही त्यांनी सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी सांस्कृतीक कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम, भक्ती गितं होता.  या ठिकामी वर्षोनं वर्ष  गुरूपौर्णिमेला भक्तांची रिघ लागलेली असते. पुरातन मंदिर असल्यामुळे इथं भक्तांना अनुभूती येते असा दावा त्यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Guru Purnima 2026 Wishes 25+: आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंना वंदन, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

दत्तादास माडये यांनी हे मंदिर बांधले होते. गुरुपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कविलगाव येथील साई मंदिरात भाविकांची  गर्दी पाहायला मिळत आहे. हे मंदिर भारतातले पहिले साई मंदिर म्हणून ओळखले जाते. अनेकांना ही बाब माहित नाही.  त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून साईभक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ​गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच साई बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि महाआरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या मंदिर मध्ये येऊ लागल्या आहेत.