सैफ अली खान हल्ला प्रकरणात एका संशयित आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप त्याच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत. दुसरीकडे सर्व जिल्ह्यातील पालकमंत्रीपदं जाहीर करण्यात आली असून धनंजय मुंडे आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वच स्तरावरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. रायगड आणि नाशिकमध्ये त्याचे प्रतिबिंब पडले. रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने मंत्री भरत गोगावले हे नाराज झाले होते. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीष महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. ज्याचे ज्या जिल्ह्यात आमदार जास्त तो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असे सुत्र ठरले होते. मात्र रायगड आणि नाशिकमध्ये त्याच्या विपरित घडले. ही नाराजी पाहात आता दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांचा सामावेश आहे. या दोन्ही नियुक्तींनी स्थगिती देण्यात आली आहे.
खो खो विश्वचषक भारतीय महिला टीमने जिंकला
खो खो विश्वचषक भारतीय महिला टीमने जिंकला आहे. नेपाळला पराभूत करून भारतानं विश्वचषकांवर नाव कोरलं आहे. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी 78-40 नं नेपाळला मात दिली. पहिल्यांदाच हा खो खो विश्वचषक पार पडला. भारतीय महिला संघाचे नेतृत्व बीडच्या प्रियांका इंगळेने केले.
मिरा भाईंदरमधील भाजप, काँग्रेस, शिंदेगटातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
मिरा भाईंदरमधील भाजप, काँग्रेस, शिंदेगट आणि सम्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे ह्यांनी ह्या सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
प्रयागराज इथं होत असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठी आग
प्रयागराज इथं होत असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठी आग लागली आहे. सेक्टर 19 मध्ये ही आग लागली आहे. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगा विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. काही भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
रायगड पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला, शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे
रायगड पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने भरत गोगावलेंचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे महाड विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह महाड विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या बिरवाडी येथील निवासस्थानी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, मोठया संख्येने जमले होते. सर्वांनी शांत रहावे असे आवाहन यावेळी गोगावले यांनी यावेळी केले.
Live Update : बडेजाव टाळा, साधेपणा स्वीकारा; संघाचा भाजप मंत्र्यांना कानमंत्र
सार्वजनिक जीवनात बडेजाव टाकून साधेपणा ठेवा आणि जनतेत राहून जनतेची कामे करा असा कानमंत्र संघाकडून महाराष्ट्र सरकारमधील भाजप च्या नवनियुक्त मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई येथे संघ आणि भाजप चे महाराष्ट्रातील मंत्री यांच्यात दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकी दरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती येत आहे.
Live Update : सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे तरुणाच्या अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू
- सोलापूर हैदराबाद रोडवर नळदुर्ग जवळ ट्रकने मोटरसायकलस्वाराला दिली धडक
- भीषण अपघातात दुचाकीस्वार अमित नागणे जागीच ठार
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफूल इस्लाम शेहजाद आहे. तो 30 वर्षांचा आहे. हा आरोपी चोरीच्या हेतूने त्या घरात शिरला होता. त्याला आज कोर्टात सादर करण्यात आलं. त्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशनात अजित पवार मार्गदर्शन करताना
Live Update : संभाजीनगरात आज आक्रोश मोर्चा, संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी
संभाजीनगरात आज आक्रोश मोर्चा, संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी
Live Update : अजित दादांनी मुंबई शहराचं नेतृत्व करायला हवं - सुनील तटकरे
आपल्या मनातील दीर्घकाळापासून असलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला शहरात पक्ष विस्तार करावा लागेल. दादांनी मुंबई शहरात नेतृत्व करायला हवं. मुंबई पदाधिकारी संघटनेची पुनर्बांधणी केली जाईल - सुनील तटकरे
Live Update : नाशिकमध्ये एक कोटींची दारू जप्त
नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एक मोठी कारवाई करत गोवा निर्मित एक कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त केलाय. एका कंटेनरमधून या दारूची वाहतूक मालेगावच्या दिशेने केली जात असतानाच दरेगाव शिवारात रात्रीच्या सुमारास सापळा रचत ही कारवाई करण्यात येऊन कंटेनरचालकाला ताब्यात घेण्यात आले. कंटेनरची झडती घेतली असता 1 हजार 54 बॉक्स मधून 1 कोटी 9 लाख रुपयांची गोवा वगळता इतर राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेली व्हिस्की दारू पकडण्यात आली. दरम्यान हे एक मोठे रॅकेट काम करत असल्याचा संशय असून त्यानूसार पुढील कारवाई केली जाते आहे.
Live Update : अजितपर्व आता नवीन नाही. 1992 पासून सुरू आहे - सुनील तटकरे
अजितपर्व आता नवीन नाही. 1992 पासून सुरू आहे. आधी संघर्ष केला. आता संघर्ष संपला. आता काम चांगले करायचं - सुनील तटकरे
Live Update : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू
जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बल्लारशा - गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही - आलेवाही स्टेशन च्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने घडली. मृतक वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे.
Live Update : धनंजय मुंडेंचं सूचक ट्वीट
Live Update : राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी - नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 18 जानेवारी रोजी नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख
‘राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’
‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा ‘
आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होण पक्ष हिताच नाही- नवाब मलिक
Live Update : चांदवडच्या देवी मंदिर घाटात ट्रेलरला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात एका टेलरला अचानक आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. कारखान्यांसाठी लागणाऱ्या अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला 50 हून अधिक टायर आहेत.
Live Update : अमरावतीच्या चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणात पाच आरोपी विरुद्ध महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Live Update : धारावीत बाॅम्बच्या अफवेने खळबळ, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन
धारावीत बाॅम्बच्या अफवेने खळबळ
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन
फोन करणाऱ्या व्यक्तीने धारावीच्या राजीव गांधीनगर येथे बाॅम्ब ठेवल्याची माहिती दिली
या घटनेने धारावी पोलिसांनी तपासला सुरूवात केली
मात्र तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आलं नाही
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे
Live Update : उदगीरमधील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच; भोपाळ प्रयोगशाळेचा अहवालाने लातूर जिल्ह्यात खळबळ
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील हुतात्मा स्मारक आणि महात्मा गांधी उद्यान याठिकाणी गत आठवड्यात अनेक कावळे मृत अवस्थेत आढळून आले होते . शहरातील नागरिकांनी या मृत कावळ्यांची माहिती प्रशासनाला दिली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने मृत्य कावळ्याचे वैद्यकीय नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथील अहवाल एच 5 एन 1 एव्हीयन इन्फ्ल्यूंझा पॉझिटिव्ह आला असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शनिवारी दोन्ही उद्याने दुपारी बंद करण्यात आले आहेत बर्ड फ्लू बद्दल जी मार्गदर्शन तत्वे आहेत त्यानुसार उपाययोजना करण्यातबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागासह प्रशासन अलर्ट झाले आहे.
Live Update : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीयेत उलट बिघडवतायत त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा म्हणून केली विनंती. सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केली टीका.
Live Update : हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी संकटात
ऐन हंगामात हरभऱ्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंता पसरली आहे. वाशिम बाजार समितीत हरभऱ्याला केवळ ४,८५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. हा दर सरकारने जाहीर केलेल्या ५,५७५ रुपये प्रति क्विंटल हमीभावाच्या तुलनेत खूपच कमी आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना
स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले.
Live Update : आज मुंबईत टाटा मॅरेथॉनचे आयोजन
आज मुंबईत टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज सकाळी 3 ते दुपारी 2 पर्यंत, मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, मॅरेथॉन मार्गावर काही वाहतूक बदल करण्यात येत आहे. टाटा मॅरेथॉन दरम्यान, फुल मॅरेथॉन हौशी (ॲम्युचर), फुल मॅरेथॉन (इलाईट), अर्ध मॅरेथॉन आणि पोलीस कप, 10 किलोमीटर रन, चॅम्पीयन्स विथ डिसअॅबीलीटी रन, सिनीयर सिटीझनस रन, ड्रिम रन अशा सात स्पर्धांचा समावेश आहे.
सदर मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसेच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील आझाद मैदान, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, डी. बी. मार्ग, ताडदेव, वरळी, बांदा, दादर व माहीम वाहतूक परिसरातील आहे.
सदर दिवशी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, सदर मार्गावरील वाहतुकीस पर्यायी व्यवस्था करून इतरत्र वळविणेकरीता आणि वाहतूकीचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी आदेश पारीत केले आहेत.
Live Update : रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा
भरत गोगावले यांना डावलल्यावरुन महाडमधील शिवसैनिक संतापले
रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरुन महामार्ग रोखला