संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात (Praveen Gaikwad attack) आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांना काळं फासण्यात आलं. यावेळी त्यांच्या अंगावर काळी शाई टाकण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटमधील अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS 2023 कलम 115(2),189(2),191(2),190,324(4), या कलमांतर्गत करण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Assam News: पत्नीसोबत घटस्फोट मिळाला, पतीने 'असा' साजरा केला आनंद, म्हणाला मी आता..
शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे, किरण साळुंखे ,भैया ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर शिरगिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर शाई-वंगण टाकणे , धक्काबुक्की, हाताने मारहाण करणे तसेच गाडीला दगड मारून नुकसान केले असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी या मारहाणीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे.