Sambhaji Maharaj's funeral information is fictional : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यविधीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांनी 'संभाजी' कादंबरीत दिलेली माहिती काल्पनिक असल्याची कबुली स्वत: पाटील यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलटतपासणीवेळी विश्वास पाटील यांनी ही बाब मान्य केली, असं सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे.
महाराजांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक...
पुणे येथे शुक्रवारी विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलटतापणी घेण्यात आली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संभाजी या कादंबरीत विश्वास पाटील यांनी दिली माहिती काल्पनिक असून कोणत्याही ऐतिहासिक दस्तात याची नोंद नसल्याचं त्यांनी मान्य केलं. संभाजी महाराज यांच्या अंत्यविधीच्या उल्लेखावरुन महाराष्ट्रातील दोन समाजात वाद निर्माण झाला होता. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांची चौकशी सुरू होती. या तपासात विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरीतील महाराजांच्या अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक असल्याचं मान्य केलं. विशेष म्हणजे यातील दामाजी पाटील, पाटणीन हे पात्र काल्पनिक असल्याचंही सांगितलं, एसं हिरे यांनी नमूद केलं. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
संभाजी कादंबरीतील कोणत्या उल्लेखावरुन वाद निर्माण झाला होता?
संभाजी कादंबरीतील अनेक उल्लेखावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. अनेक इतिहासतज्ज्ञांनी या कादंबरीतील उल्लेख कोणत्याही बखरीत नसल्याचा दावा केला आहे.