Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर भीषण अपघात! खासगी ट्रॅव्हल्सचा चक्काचूर, प्रवासी बसमध्येच अडकले

पिंपरी माळी गावाच्या शिवारात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस समोर चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा:

Samruddhi Highway Bus Accident:  समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. आज पुन्हा एकदा बुलढाण्याच्या मेहकरजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. मेहकर जवळील पिंपरी माळी गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसने समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील तब्बल २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भागाचा पार चक्काचूर झाला आहे.

Monsoon Updates: 12 जूनपर्यंत सूर्य आग ओकणार! मान्सूनच्या आगमनानंतरही 'या' भागात तापमान 40 अंशांच्या पार जाणार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 25 जखमी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. 'बाबा ट्रॅव्हल्स'ची ही खाजगी लक्झरी बस प्रवाशांना घेऊन पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, पिंपरी माळी गावाच्या शिवारात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस समोर चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.

Advertisement

धडक एवढी तीव्र होती की, अपघातानंतर गेल्या एक ते दीड तासापासून काही प्रवासी बसच्या चक्काचूर झालेल्या भागामध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले असून, जखमींना बसमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गंभीर जखमी असलेल्या दोन प्रवाशांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा आणि चालकाची डुलकी या अपघाताला कारणीभूत ठरली का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला