Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वरील वाहतूक उद्यापासून 27 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद; कधी अन् कुठे? वाचा..

जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गावर हे काम होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा

Samruddhi Highway Closed:  समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  समृद्धी महामार्गावर 8 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गॅन्ट्री बसविण्यासाठी हा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असून 15 टप्प्यांमध्ये हे काम  करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

समृद्धी महामार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम 8 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत 15 टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

या कामासाठी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या 296 किमी ते 502.752 किमी या दरम्यान गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यांमधून तसेच जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमधून जाणाऱ्या मार्गावर हे काम होणार आहे.

दरम्यान, गॅन्ट्री बसविण्याच्या कामादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक सुमारे 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Nashik News: प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर यांची आत्महत्या; नाशिकमध्ये खळबळ

Topics mentioned in this article